नवी दिल्ली : मागील दोन दिवसांपासून 19 आमदारांच्या बळावर सरकार अस्थिर करू पाहणाºया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर आज मोठी कारवाई केली आहे. त्यांच्याकडील दोन्ही पदे काढून घेतली आहे. आता राजस्थानातील राजकारण कुठल्या वळणावर पोहोचणार याबाबत जयपूरपासून दिल्लीपर्यंत चर्चा सुरू आहे.
सरकारमधील 19 आमदारांना सोबत घेऊन सरकार पाडण्याचे षडयंत्र केल्याच्या आरोप सचिन पायलट यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच, यांची सर्व महत्त्वाची पदे काढून घेण्यात आली. केवळ दोन दिवसांतच नेतृत्वाने अंतिम निर्णय घेतल्याने काँग्रेसमध्ये वारसांच्या बंडखोरी लाड होत नसल्याचे दाखवून दिले आहे. कारण पायलट यांचे वडिल राजेश पायलट हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते़ त्यांनी केंद्रीय मंत्रिपदही भूषवले आहे. असाच अनुभव तीन ते चार महिन्यांपूर्वी आला आहे. मध्यप्रदेशातील युवा नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँगे्रसबाहेर पाऊल टाकले़ त्यांचे वडिल माधवराव शिंदे हे सुद्धा पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. पायलट आणि शिंदे दोन्ही कुटुंबांना काँग्रेस नाव, प्रतिष्ठा मिळवून दिली. मात्र, त्यांच्या वारसांना आपल्या उमलत्या राजकीय काळात उत्साहाच्या भरात बंडखोरीचे पाऊल उचलल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
दरम्यान, सचिन पायलट यांच्या बंडानंतरही राजस्थान सरकारला तूर्तास धोका नाही. कारण या 19 आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली की संख्याबळ 180 इतके होते. त्यामुळे बहुमताचा आकडा 91 वर येतो. गहलोतांकडे तूर्तास तरी 100 च्या पुढे आमदार आहेत.
दरम्यान, या सर्व परिस्थितीकडे भाजप लक्ष ठेऊन असल्याचे समजते.
Check Also
नागपुरात वाढतेय थंडी : राजकीय पारा चढला
राज्यातील विदर्भ वगळता इतर भागात आजदेखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अधिकांश भागात …
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या!
‘उद्धव ठाकरे यांच्याआधी माझी बॅग तपासल्या गेली. सर्वांच्याच बॅग तपासल्या जात आहेत. मात्र, काही लोकांना …