Breaking News

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम : भिडीत लोकप्रतिनिधी कार्यशाळा व आरोग्य तपासणी

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ उपकेंद्र हुसनापूर अंतर्गत *भिडी  येथे ग्रामपंचायत सदस्य लोक प्रतिनिधी कार्यशाळा व आरोग्य तपासणी*  २९ सप्टेंबर रोजी सरपंच सचिन बिरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी या मोहिमे बाबत सविस्तर माहिती दिली. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधीची भुमीका महत्त्वाची आहे .लोकांच्या मनात भिती व गैरसमज असल्यामुळे आरोग्य पथकास योग्य माहिती देत नाही यासाठी ग्राम पंचायत सदस्यानी लोक प्रतिनिधी यांनी लोकांची समजुत घालून.होणाऱ्या बाधीत रुग्णाला वेळीच उपचार देण्यासाठी मदत होईल ,तरी लोक प्रतिनिधीनी सहकार्य करावे अशी विनंती आरोग्य विभागाच्या वतिने दिलीप उटाणे यांनी केले
  ते पुढे म्हणाले  *माझे कुटुंब  माझी जबाबदारी अंतर्गत आरोग्य कर्मचारी पथक घरोघरी जावून कुटुंबातील सदस्या सोबत आतंरव्यक्ती संवाद करुन घरातील सदस्यांना सर्दी ताप खोकला आहे काय?  इन्फ्यारेड थरमा मिटर व्दारे  ताप . व पल्स आँक्सीमिटर व्दारे   शरिरातील आँक्सिजन पातळी  तपासणी करण्यात येणार   आहे .जर एकाद्या व्यक्तीच्या रक्तातील आँक्सिजन ९५ % पेक्षा कमी असल्यास साभाव्य  बाधित  व्यक्तीचा शोध घेतला जातो .तरी नागरीकांनी न घाबरता न भिता घरी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य माहीती द्यावे असे आवाहन आरोग्य सेवाक दिलीप उटाणे यांनी केले . भिडी येथे  २९ सप्टेबर रोजी माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमाची सुरुवात लोक प्रतिनिधीची  आरोग्य तपासणी करुन  सरपंच सचिन बिरे उपसरपंच  अतुल खेञी यांच्या हस्ते तर  मनोज बोबडे छाया ताजने  धनराज वाघाडे मालू कुरटकर राजेन्द खडसे अंजना कुभेकर मेघा गुळफोडे अर्चना भिंगारे संगिता कचवे यांच्या उपस्थितीत  करण्यात आले. मोहीमेत योग्य माहिती देवून  आपले कुटुंब सुरक्षित  ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार .जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे  प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले  जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ   प्रभाकर नाईक यांनी केले असून  कार्यशाळेला लोकप्रतिनिधी आशा वर्कर  प्रतिभा जाधव ज्योषणा भगत शोभा चिचघाटे  कुसूम नाल्हे  शारदा वाघ व स्वयंसेवक पेम मानकर राम नाल्हे सुरेश मानकर  विनोद भुजाडे कृष्णा राउत उपस्थित होते.  तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रविण धमाने यांच्या मार्गदर्शनात आरोग्य तपासणी सुरु आहे .  कार्यशाळेचे  प्रास्तावीक     आरोग्य सेवक .माधव कातकडे  यांनी   समुदायीक सर्वेक्षणात गृहभेटी व्दारे रुग्ण व संपर्कातील व्यक्तीचा शोध, कोवीड प्रतिबंध आणि नियंत्रण बाबत समुदायात जागरुकता  निर्माण करणे, वैयक्तिक सुरक्षाकशी करावी या बाबात आरोग्य शिक्षण देण्यात दिले.
संचालन व आभार ग्रामविकास अधिकारी प्रमोद चौधरी यांनी केले

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *