वर्धा जिल्हा प्रतिनिधी : वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांच्या वर्धा येथील जनसंपर्क कार्यालयात अद्ययावत व सर्व सुविधायुक्त बैठक सभागृहाचे उद्घाटन भाजपाचे संघटन मंत्री डाॅ. उपेन्द्रजी कोठेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कोविड-19 महामारीच्या कार्यकाळात सर्व बैठका व चर्चासत्रे आॅनलाईन पध्दतीने संपन्न होत असतांना काळाची गरज म्हणून आॅनलाईन पध्दतीने इंटरनेट सह सज्ज असे उपकरणे, इंटरनेट सुविधा, काॅम्पुटर, राउंड टेबल इत्यादी सर्व सुविधायुक्त खासदार रामदास तडस यांनी अतिशय चांगल्या प्रकारे एक वास्तु निर्मीत केली आहे याचा लाभ सर्व सामान्य जनतेसह प्रत्येक कार्यकत्र्याला होईल असे प्रतिपादन डाॅ. उपेन्द्रजी कोठेकर यांनी या प्रसंगी केले.
बैठक सभागृहाच्या उद्घाटनानंतर भाजपा वर्धा जिल्हा कोअर कमिटीची बैठक सभागृहात संपन्न झाली, यावेळी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष डाॅ. शिरीष गोडे, आमदार दादाराव केचे, आमदार डाॅ. पंकज भोयर, आमदार प्रा. अनिल सोले, किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटनीस सुधिर दिवे, भाजपाचे प्रदेश सचिव राजेश बकाने, जि.प.अध्यक्ष सौ. सरीताताई गाखरे, किशोर दिघे, अविनाश देव, मिलींद भेंडे, नितिन मडावी, अतुल तराळे, भुपेन्द्र शहाणे बैठकीला उपस्थित होते.
बैठकी दरम्यान अनेक महत्वपुर्ण विषयावर तसेच आगामी काळातील कार्यक्रमावर सविस्तर पणे चर्चा करण्यात आली सोबतच कृषी विधेयकांचा प्रसार, कामगार विधेयकांचा प्रसार, पदविधर विधान परिषद मतदार संघाबाबत नियोजन या सोबतच भाजपा वर्धा जिल्हा संघटनेतील विविध विषयावर सल्ला मसलत करण्यात आली.