Breaking News

ACC, LLOYD’S, व WCL या तिन कंपनीचा डस्ट खात आहो यांच्या मोबदला म्हणून विज, पाणी मोफत पाहिजे-सुरेश मल्हारी

ACC, LLOYD’S, व WCL या तिन कंपनीचा डस्ट खात आहो यांच्या मोबदला म्हणून विज, पाणी मोफत पाहिजे*
*सुरेश मल्हारी पाईकराव जिल्हा महासचिव BRSP यांनी केली मागणी*
  घुग्घुस-  प्रभाकर कुम्मरी- बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चंद्रपूर शाखा घुग्घुस चा माध्यमातून मा. जिल्हाधिकारी साहेब व उप-प्रादेशिक अधिकारी साहेब महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना निवेदन देण्यात आले. घुग्घुस येथे ACC सिमेंट कंपनी, LLOYD’S MATEL कंपनी, व WCL खदान आहेत या तीनही कंपनीचे प्रदुषण हे घुग्घुस गावामध्ये खुप मोठा प्रमाणात होत आहे ACC कंपनी जवळ जिल्हा परिषद तेलगु शाळा, सरस्वती बागला विद्यालय, व बाजुला MOUNT CONVENT शाळा आहे तसेच LLOYD’S MATEL कंपनीचा जवळ जनता विद्यालय, जनता महाविद्यालय, जनता कॉन्व्हेंट, MCVC महाविद्यालय, SMS महाविद्यालय प्रथमेश कॉन्व्हेंट, विय्यानी विद्या मंदिर, प्रियदर्शनी विद्यालय प्रियदर्शनी महाविद्यालय, प्रियदर्शनी कॉन्व्हेंट आहे. या दोन्ही कंपनीच्या जवळ लागुन असलेले हे सर्व शाळा आहेत. आणि या शाळेत येणारे लहान लहान चिमुकल्या मुलांना या कंपनी चा प्रदुषणामुळे त्यांचे उज्ज्वल भविष्य हे धोक्यात आहे. तसेच WCL हे संपूर्ण घुग्घुस गावाला भोवताल घेरलेले आहे. या WCL खदानीमुळे घुग्घुस गाववासियांना खुप मोठा प्रदुषणाचा त्रास भोगावा लागत आहे. ACC, LLOYD’S व WCL या तीनही कंपनीचे ट्रान्सपोर्ट हे घुग्घुस गावाचा मधोमधुन होतो या जड वाहतूकीने घुग्घुस गाववासियांनी आपले जिव सुध्दा गमावलेले आहे. गावामध्ये ACC, कंपनीचे सिमेंट व WCL, खानीचा कोळसा खुप मोठा प्रमाणात  वाहतूक होते या रेल्वे होणाऱ्या ट्रान्सपोर्ट इथे रेल्वे गेट लागला कि खुप मोठ्या प्रमाणात वाहणांची लाईन लागते आणि घाईघाईत जाण्यासाठी नागरिक*
*अधा- मधातुन वाहने टाकतात अशा मुळे इथे खुप मोठ मोठे अपघात सुध्दा झाले आहेत इथे रेल्वे उडान पुलीया नाही.*
*या प्रदुषणाचा, वायु प्रदुषण ध्वनीप्रदूषण यांच्या मुळे घुग्घुस गाववासि खुप मोठे त्रस्त झालेल्या आहे. या  तिनही कंपनीचा प्रदुषणामुळे कॅन्सर, टिबी, खोकला, दमा, त्वचारोग, डोळ्याचे आजार गळ्याचे आजार इत्यादी सर्व आजार या कंपनीचा प्रदुषणामुळे जास्त होत आहे म्हणून जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पाईकराव यांनी म्हटले कि आम्ही या तीनही कंपनीचे जेव्हा या सर्व गोष्टी सहन करत आहो अपघातात सहन करत आहो प्रदुषण सहन करत आहो. या तिनही कंपनीचे जेव्हा प्रदुषण आम्ही खात आहो तर यांचा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे संपूर्ण घुग्घुस गाववासीयांचा हक्कासाठी 1) या तीनही कंपनीकडून विज मोफत मिळाल पाहिजे.*
*2) या तीनही कंपनीकडून शुद्ध पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे*
*3)या तीनही कंपनी मध्ये घुग्घुस गावातील स्थानिकांना 80% रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा*
*4)या तीनही कंपनीचे जड वाहतूकसाठी बायपास चा वापर करण्यात यावा.*
 *5) पोलीस स्टेशन व राजीव रतन येथे उडान पुल बनविण्यात यावा*
 *या सर्व मागण्या लवकरात लवकर* *पूर्ण करण्यात यावा अन्यथा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या माध्यमातून तीव्र भूमिका घेऊन आंदोलन करण्यात येईल व या आंदोलनात जे नुकसान होऊन त्या* *नुकसान भरपाई चे सर्वस्वी जबाबदारी हे ACC, LLOYD’S व WCL चे राहिल अशा देखील इशारा देण्यात आला*
*असे निवेदन सादर करताना BRSP जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी* *पाईकराव, मायाताई सांड्रावार, अशोक आसमपल्लीवार, जगदीश मारबते, युवा अध्यक्ष ईश्वर बेले, युवा उपाध्यक्ष दिपक दिप, महिला आघाडी अध्यक्षा रमाबाई सातारडे, भाग्यश्रीताई भगत, शरद पाईकराव, जोशनाताई डांगे,रिनाताई निखाडे, भावनाताई कांबळे,दिपाताई निखाडे, वनिताताई निखाडे, अशोक भगत, नितीन कन्नाके राकेश पारशिवे, आदित्य सिंह, सदानंद ढोरके, सचिव माहुरे, इरफान पठाण, अरविंद चहांदे, सुमीत फुलकर, विलास पचारे, दत्ता वाघमारे, करण काळबांडे, सारंग गाताडे, फारुख शेख, कैलाश चनुरवार, अमित चव्हाण, आदी उपस्थित होते.

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *