Breaking News

अधिकाऱ्यांना अधिकचे वेतन कशाला? : रेती, अन्य मार्गानी कमवितात कोटींची संपत्ती

Advertisements

ग्रेड पे निश्चितीसाठी तहसीलदार, नायब तहसीलदार अधिकाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत‎ कामबंद आंदोलन सुरू केले आहे.‎ नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग -२‎ यांचे ग्रेड पेच्या मागणीसाठी संप‎ पुकारला आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी‎ काही प्रमाणात महसुली कामांवर‎ परिणाम झाल्याने दिसून आले.‎ विविध जिल्ह्यातील अधिकारी या संपात‎ सहभागी आहेत. तत्पूर्वी नागरिकांना‎ संपादरम्यान कोणतीही समस्या निर्माण‎ होऊ नये, म्हणून मंडळ‎ अधिकाऱ्यांकडे कामाची जबाबदारी‎ सोपवली आहे.‎ सन १९९८ पासूनचा नायब‎ तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांवरील अन्याय दूर करावा, त्यांना‎ राजपत्रित अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी‎ लागू करावी, या मुख्य मागणीसाठी हे‎ बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे.

Advertisements

कारेमोरे यांचा आक्षेप

Advertisements

तर, काही तहसीलदार, नायब तहसीलदार विविध मार्गानी अपसंपदा जमवितात. रेती तस्करांसोबत संबंध ठेवतात. दर महिन्याला रेती तस्कर यांच्याकडून तहसीलदार, नायब तहसीलदार यांना मोठी रक्कम देण्यात येते. त्यामुळे नायब तहसीलदार, तहसीलदार यांना अधिक वेतनाची काय आवश्यकता,असा सवाल अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी उपस्थित केला आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

राज्यातील रस्त्यांची कामे ठप्प : कंत्राटदारांचे कामबंद आंदोलन सुरु

राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करुनही शासकीय कामांची दीड वर्ष झाली तरी थकीत दयेके मिळत नसल्याने …

कंत्राटदार ७ एप्रिलपासून कामबंद करणार : फडणवीस सरकारवर रोष

जिल्हा पातळीवर केलेल्या शासकीय कामांची देयके गेली १६ महिने मिळत नसल्याने राज्यातील शासकीय कंत्राटदारांनी ७ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *