‘EVM ऐवजी मतपत्रिकेवर होणार निवडणुका?’: मोठी बातमी

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच EVM ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात, धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. तर मराठा समाजाचे जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे. त्यामुळे जास्त उमेदवारी अर्ज आल्यास EVM ऐवजी मतपत्रिका आणि मतपेट्यांचा वापर करावा लागेल, असेही सचिन ओम्बासे यांनी म्हटले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत मार्गदर्शन सूचना कळवाव्यात असेही सांगितले आहे.

 

डॉ.सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागवले असून मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांना पत्र लिहून ही शक्यता वर्तविली आहे. तर मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागेल ही बाब निदर्शनास आणून देत आयोगाकडून मार्गदर्शन मागवले आहे. धाराशिव जिल्ह्यात 736 गावे असून बार्शी आणि औसा या तालुक्यातील जवळपास 150 पेक्षा जास्त गावे आहेत. 384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर / मतपत्रिकावर निवडणुक घ्यावी लागते. एका मतदार संघात जास्तीत जास्त 24 मशीन उपलब्ध होऊ शकतात त्यात एका मशीनमध्ये 16 उमेदवार असे 384 उमेदवार ईव्हीएमवर निवडणुक घेता येतात.

About विश्व भारत

Check Also

राज्यातील अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड

महिनाभर प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीचे मतदान आज, बुधवारी होत असून, त्यात ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार …

अनिल देशमुख यांच्यावर कोणी केला हल्ला? मोठा दावा

विधानसभेचा प्रचार थंडावल्यानंतर काल नागपूरमध्ये राज्याच्ये माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *