Breaking News

महापालिका उपायुक्तांनी पुतणीशीच केलं लग्न!

Advertisements

बिहारमधील बेगलसुराय महानगर पालिकेतील उपायुक्तांनी आपल्या पुतणीबरोबर लग्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 31 वर्षीय शिव शक्ती कुमार यांनी त्यांची पुतणी सेजल सिंधूबरोबर लग्न केलं आहे. सेजल ही 24 वर्षांची असून दोघांचा विवाह 14 ऑगस्ट रोजी कात्ययानी मंदिरामध्ये पार पडला. या विवाहाची संपूर्ण शहरामध्ये चर्चा असताना सेजलने उघडपणे आपल्या लग्नाचं समर्थन केलं आहे. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडून कोणताही गुन्हा केलेला नाही. आम्ही आमच्यासमोर असलेल्या आव्हानांपासून पळून जाणार नसून त्यांचा सामना करणार आहोत, असं सेजलने सांगितलं आहे. तसेच शिव शक्ती कुमार यांच्या कुटुंबियांनी आमच्याविरुद्ध चुकीची तक्रार दाखल केल्याचा दावाही सेजलने केला आहे.

Advertisements

 

Advertisements

आपलं म्हणणं एका व्हिडीओच्या माध्यमातून मांडताना सेजलने, “प्रेमात पडणं हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय असतो. यामध्ये इतर कोणीही दखल देता कामा नये. आमच्याविरुद्ध वैशाली येथे दाखल केलेल्या एफआयआरमध्ये कोणतेही तथ्य नाही. आम्ही लग्न केल्यानंतर आमचे कुटुंबीय आमचा छळ करत आहेत. ते आता माझ्या नवऱ्याच्या नोकरीमध्ये अडखळे आणण्याबरोबरच आमच्या संसारामध्ये अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा आरोप केला आहे.

स्वत:ची लव्ह स्टोरी सांगितली

आपली लव्ह स्टोरी सांगताना सेजलने, “प्रेमात पडणं हा काही गुन्हा नाही. आम्ही 2015 पासून एकमेकांच्या संपर्कात होतो. आमच्या पूर्वजांची घरं एकाच गावात आहेत. मी 2015 मध्ये बनारसमधील सेंट्रल हिंदू गर्ल्स स्कूल येथे शिक्षणासाठी गेले. त्यावेळी तिथे शिव शक्ती हे बनारसमध्ये पद्युत्तर शिक्षणासाठी आले होते. तिथेच आमची पहिली भेट झाली. आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो. आमच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं,” असं सांगितलं.

दोघेही एकाच गावचे

शिव शक्ती कुमार हे सध्या मोठ्या सुट्टीवर असून त्यामागील कारण लग्नच असल्याची सध्या चर्चा आहे. शिव शक्ती कुमार हे बिहारमधील हिजापूर जिल्ह्यातील मनूआ गावातील रहिवाशी असलेल्या रामा शंकर राय यांचे पूत्र आहेत. सेजल सिंधू सध्या पद्युत्तर शिक्षण घेत आहे. सेजल ही प्राध्यापक विजय कुमार राय यांची कन्या आहे. दोघांचेही वडील एकाच गावात राहतात. नात्याने सेजल आणि शिव शक्ती कुमार हे पुतणी आणि काका आहेत.

मागील 10 वर्षांपासून प्रेमात; दोन महिन्यापूर्वी कामावर रुजू

सेजल मागील शुक्रवारी बेगलसुराय महानगर पालिकेत आली आणि त्यानंतर ती उपायुक्त शिव शक्ती कुमार यांच्याबरोबर एकत्रच कार्यालयातून बाहेर पडली. शिव शक्ती कुमार हे कार्यालयातून सेजलबरोबर बाहेर पडल्यानंतर तीने कोणताही व्हिडीओ किंवा पोस्ट केलेली नाही. मात्र लग्नानंतर सेजलने आपण मागील 10 वर्षांपासून शिव शक्ती कुमार यांच्या प्रेमात होतो असं सांगितलं. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच शिव शक्ती कुमार यांची बेगलसुराय महानगर पालिकेमध्ये उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मंत्री बावनकुळे करणार १५२ महसूल अधिकाऱ्यांना निलंबित

जमिनीच्या नोंदींमध्ये बेकायदेशीरपणे बदल केल्याप्रकरणी तब्बल १५२ महसूल अधिकाऱ्यांवर राज्य सरकारकडून मोठी कारवाई केली जाणार …

मंत्री बावनकुळे यांना महसूल कर्मचारी-अधिकाऱ्यांचा इतका राग का? संघर्ष पेटण्याची शक्यता

महसूल विभागात अधिकाऱ्यांनी महसूल कायद्यातील कलमांचा गैरवापर करीत ७/१२ तील दुरुस्तीच्या नावावर दोन लाखांहून अधिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *