Breaking News

“कंगना रणौतला बलात्काराचा खूप अनुभव”

शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी खासदार सिमरनजीत सिंग मान यांनी खासदार कंगना रणौत यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केले आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. शेतकरी आंदोलनावेळी झालेल्या बलात्कारांवरून कंगना रणौत यांनी केलेल्या विधानाला ते प्रत्युत्तर देत होते.

“याप्रकरणी काय बोलावं हे मला कळत नाहीय. पण कंगना रणौत यांना बलात्काराचा खूप अनुभव आहे. तुम्ही त्यांना विचारू शकता की बलात्कार कसा होतो, जेणेकरून लोकांना समजेल की बलात्कार कसा होतो”, असं संगरूरचे माजी खासदार सिमरनजीत सिंग म्हणाले. आता रद्द करण्यात आलेल्या कृषी सुधारणा कायद्यांबाबत शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत भाजपा खासदाराने अलीकडे केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता सिमरनजीत मान यांनी ही टिप्पणी केली. पंजाब महिला आयोगाने या वक्तव्याची दखल घेतली असून याविरोधात कारवाई केली जाईल, असं त्यांनी म्हटलंय.

कंगना रणौत यांचं प्रत्युत्तर

“हा देश बलात्काराला क्षुल्लक समजणं कधीच थांबवणार नाही असे दिसते. आज या ज्येष्ठ नेत्याने बलात्काराची तुलना सायकल चालवण्याशी केली. बलात्कार आणि मौजमजेसाठी महिलांवरील हिंसाचार या पुरुषप्रधान राष्ट्राच्या मानसिकतेत इतका खोलवर रुजलेला आहे की त्याचा सहज वापर केला जातो याचं आश्चर्य वाटत नाही.चित्रपट निर्माता असो वा राजकारणी असतो महिलांची टींगल केली जाते”, अशी प्रतिक्रिया कंगना रणौत यांनी दिली.

कंगना रणौत नेमकं काय म्हणाल्या होत्या?

मुंबईत एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडीओ कंगना रणौत यांनी रविवारी (२५ ऑगस्ट) आपल्या एक्स अकाउंटवरून शेअर केला. या व्हिडीओत त्या म्हणाल्या, “शेतकरी आंदोलनाच्या वेळी देशाचे नेतृत्व मजबूत नसते, तर बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागला नसता. शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी मृतदेह लटकले होते, त्या ठिकाणी महिलांवर बलात्कार झाले. जेव्हा शेतकऱ्यांच्या हिताचे तीन कृषी कायदे सरकारने मागे घेतले, तेव्हा संपूर्ण देशाला धक्का बसला. हे कृषी कायदे मागे घेतले जातील, असे आंदोलनकारी शेतकऱ्यांना अजिबात वाटले नव्हते. शेतकरी आंदोलनाच्या आड मोठे षडयंत्र रचले जात होते. त्यामागे चीन, अमेरिका यांसारख्या विदेशी शक्तींचा हात होता.”

 

कंगना रणौत यांच्या विधानामुळे वाद उद्भवताच भाजपाकडून निवेदन जाहीर करण्यात आले. त्यामध्ये म्हटले गेले, “खासदार कंगना रणौत यांनी केलेले विधान हे पक्षाच्या भूमिकेशी सुसंगत नाही. त्यांच्या विधानाचा पक्षाशी काहीही संबंध नाही. पक्षाकडून त्यांना अधिकृत भूमिका मांडण्याचा अधिकार नाही. भाजपा सामाजिक सौहार्द आणि ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास व सबका प्रयास’ या तत्त्वावर विश्वास ठेवतो.

About विश्व भारत

Check Also

माधुरी दीक्षितमुळे अभिनेत्याचा संसार उद्ध्वस्त? बायकोचं निधन…!

बॉलिवूडमध्ये काम करत असताना रिचा हिने अभिनेता संजय दत्त याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर रिचा हिने …

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन रंगभूमी ते चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांत लोकप्रिय ठरलेले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *