वर्धा प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले *माझे कुटुंब -माझी जबाबदारी* या महत्त्वाचे कार्यक्रमला गावातील नागरीकानी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत वाबगांव सरपंच निकीता शेळके यांनी केले .
प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ अंतर्गत *माझे कुटुंब माझी जबाबदारी* या कार्यक्रमाची पुर्व तयारी वाबगाँव येथील १५ सप्टेंबर रोजी सभेत उदघाटन करताना बोलत होत्या . तर सभेचे अध्यक्षतेस्थानी माजी सरपंच शुभागी गायकवाड होत्या
कोरोणा आजाराला आळा घालण्यासाठी आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी उपस्थिताना खालील प्रमाणे शपथ दिली *मी शपथ घेतो /घेते की कोरोणा विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मी स्वतः माझ्या कुटुंबात परिसरात लोकांना मास्क लावणे.आपआपसात २ मीटरचे अंतर ठेवणे साबणाने वारंवार हात धुणे या सर्व गोष्टी साठी पेरीत करेन .कोरोणाच्या काळात कोणाशीही दुर्व्यवहार अथवा भेदभाव न करता सर्वाशी आपुलकीने व आदराने वागेन कोरोणाच्या लढाईत आपली ढाल म्हणून उभे असलेले – डॉक्टर .नर्स आरोग्य सेवक रुग्णालयातील कर्मचारी .पोलीस सफाई कर्मचारी इत्यादी कार्यकर्ते यांचा मी सन्मान व समर्थन करेन त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करीन* आशी शपथ दिली .
सभेला डॉ बादल भांडारकर आरोग्य सहाय्यक दिपक मेशराम गणेश चंदेल संध्या मिश्र आरोग्य सेविका कविता झाडे भावना कांबळे प्रज्ञा उमरे निर्मला नान्हे आशा वर्कर आशा डेबरे रुपेश शेळके यशवंत परतपूरे नरेश परतपूरे व गावातील महिला पुरुष सहभागी होतो
Check Also
नागपुरात वाढतेय थंडी : राजकीय पारा चढला
राज्यातील विदर्भ वगळता इतर भागात आजदेखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अधिकांश भागात …
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या!
‘उद्धव ठाकरे यांच्याआधी माझी बॅग तपासल्या गेली. सर्वांच्याच बॅग तपासल्या जात आहेत. मात्र, काही लोकांना …