Breaking News

आयटक स्वर्ण शताब्दी समारोह सांगता… शंभर वर्ष पुर्ण करणारी देशातील पहिली कामगार संघटना आयटक– काँ दिलीप उटाणे

वर्धा :- भारतातील कामगार चळवळीला १०० वर्ष ३१ आँक्टोबर २०२० रोजी पूर्ण होत झाले .यांचा आनंद आहे परंतु आजच्या परिस्थितीत रोजगारच संपुष्टात आणल्या जात आहे रोजगार नसल्यामुळे भयावक परिस्थिती उदभण्याचे चिन्ह दिसत आहे . अशा परिस्थितीत कामगार चळवळीला व *शंभर वर्षे पुर्ण करणारी देशातील पहिली कामगार संघटना *आयटक* (आँल इंडिया टेड युनियन काँग्रेस) आहे मत आयटक राज्य उपाध्यक्ष काँ.दिलीप उटाणे यांनी व्यक्त केले.
वर्धा येथे आयटक भवन बोरगांव मेघे ३१आँक्टोबर रोजी काँ मनोहर पचारे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सदस्य काँ.ज्ञानेश्वरी डंबारे जिल्हा सचिव वंदना कोळणकर जिल्हा संघटक काँ असलम पठाण सुरेश गोसावी विजया पावडे मंगला इंगोले मैना उईके शकर मोहदूरे रामदास जाभूळकर माला भगत अनिसचे राज्य सरचिटणीस गजेन्द सुरकार साहसिक जनशक्तीचे रविन्द कोटंबकार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयटक स्वर्ण शताब्दी सांगता समारोह कार्यक्रम घेण्यात आला.
सुरुवातीला *लाल झेंड्यला सलामी व कामगार नेते माजी खासदार काँ गुरुदास दासगृप्ता यांच्या प्रथम स्मृती दिनी अभिवादन करण्यात आले*
काँ उटाणे पुढे बोलताना म्हणाले *मुनाफ्यात असणारे . सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण करुन रोजगार नष्ट करण्याचे काम हल्लीचे सरकार करीत आहे* सार्वजनिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात देशाच्या मालकीची संपत्ती विकली जात आहे,त्यामुळे बेरोजगारांची दरी मोठी होणार असून अराजकता वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
आयटकची स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडलेली नाळ महत्त्वाची आहे *१९४६ च्या नाविकांच्या उठावा पर्यंतही तुटली नाही. नाविकासह या उठावात मुंबईचा गिरणी कामगारही सहभागी होता* व तिरंग्या.हिरव्यासह *विळा -हातोड्याचा लाल झेडा यावेळी फडकविण्यात आला होता.भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी जोडून घेणारा आयटकच्या नोव्हेंबर – डिसेंबर १९२१ साली झालेल्या दुसऱ्या अधिवेशनात पहिलाच ठराव होता.
आयटकची शक्ती वाढली होती कामगारात वर्गीय जाणीव निर्माण झाल्या होत्या , म्हणूनच बिटिश सामाराज्यवादा विरोधात त्यांनी दंड थोपटले होते .एकीकडे चिवट लढ्ये करुन १८८१ च्या कारखाना कायद्यात बदल करावयास भाग पाडणे .खान कायदा बदलावयास लावणे.प्रसृती रजेसाठी .१९२६चा टेड युनियन कायदा करावयास भाग पाडणे इत्यादी साठी संघर्ष करणारी संघटना आयटक होय .स्वातंत्र्य लढ्यात शेकडो नेत्यासह हजारो कामगारांचे बलिदान दिले. अशा मोठा इतिहास आहे.
*आजची आव्हाने*
भारतातील दिडशे वर्षाच्या कामगार चळवळीतच्या इतिहासात १०० वर्षाचे आयटकचे योगदान मोलाचे ठरलेले आहे.कामगार वर्गाने प्रचंड लढा करुन जे मिळवले ते काढून घेण्याचा प्रयत्न सत्तेवर बसलेले पक्ष व सत्ताधारी वर्ग आज जोमाने करीत आहेत.कामगार कायदे बासणात गुंडाळले जात आहेत .संघटीत क्षेत्र कमी करुन असंघटीत क्षेत्राला सुज आणली जात आहे.*सेवा सुरक्षा .पेन्शन .किमान वेतन .कल्याणकारी सुविधा सर्वच बंद केले जात आहेत .जाती अस्मिताचा वापर करुन जाती जातीत तेड निर्माण करण्यात येत आहे .वर्ग जाणीवा ठिसूळ केल्या जात आहेत .! कामगार वर्गासह शेतकरी शेतमजूर ,छोटे व्यवसायीक.कारागीर आदीवर सरकारी हल्ले वाढले आहे. धर्माचा..देशपेमाचा .गो पेमाचा खुबीने वापर केला जात आहे . कामगार चळवळी समोरील मोठी आव्हाने आहेत.
हे पेलविण्यासाठी सर्व कामगार संघटनानी एकत्र येवून लढा दिल्या शिवाय पर्याय नाही.
*वर्ग व जात अंताचा संघर्ष तीव्र करा*
दलित श्रमिक एकजूट मजबूत करा.
*कामगार कायद्यात बदल करणाऱ्या सरकारला जाब विचारु या!!!* २६ नोव्हेंबर देशव्यापी संपात हजारोच्या संख्येने कामगाराने सहभागी होवू एकीचे दर्शन दाखवावी असे आवाहन केले .
*कामगार योध्दा* म्हणून गजानन गांवडे (नवभारत) महेश सायखेडे (लोकमत ) अजिज शेख बिसीएन न्युज. एकनाथ चौधरी महाराष्ट्र टाईम्स समुह.रविन्द कोंटबकार (साहसिक) मिलींद आडे (झी २४) अनुप भार्गव( पुलगावा टाईम्स) नामदेवराव राउत किशोर चिमुरकर रामभाउ धाबेकर निलेश उळदे रजनी बाकरे दिपक कांबळे भारती मून विनायक नन्नोरे राजेश इंगोले यांना स्मृती चिन्ह देवून गौरविण्यात आला.
*कोरोणाची साथ असल्यामुळे जिल्ह्यातील ५८९० आयटक सभासदानी आपल्या घरावर लाल झेंडा लावून आयटकचा १०० वा स्थापना दिवस साजरा केला*
अरुणा नागोसे अल्का भानसे प्रफुल्ल डुकरे शंकर हुलके सोनाली पडोळे हर्षा बाकरे आमरपाली बुरबूरे रजना फुलझले निलेश साटोणे विकास माणिककुडे सुजाता घोडे लिला ढोबळे रंजीता सुरकार कृणाल वाघमारे विशाल राउत अमोल दोडके यांनी विषेश परिश्रम घेतले

About Vishwbharat

Check Also

रामलला प्राण प्रतिष्ठा करने वाले 86 वर्षीय मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित का निधन

रामलला प्राण प्रतिष्ठा करने वाले 86 वर्षीय मुख्य पुजारी पं लक्ष्मीकांत दीक्षित का निधन टेकचंद्र …

देश में बनेंगे 50000 किमी एक्सप्रेसवे?अलग अथॉरिटी की तैयारी! NHAI संभालेगा सिर्फ महामार्ग

देश में बनेंगे 50000 किमी एक्सप्रेसवे?अलग अथॉरिटी की तैयारी! NHAI संभालेगा सिर्फ महामार्ग टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *