वर्धा : देवळी:- जनतेने आपल्याला गावाच्या विकासाचे काम करण्यासाठी निवडून दिले आहे. ज्या पदावर आपण विराजमान होतो. त्या पदाचे अधिकार, कर्तव्ये, नियम समजून घेतले पाहिजेत. गावाचा विकास करायचा असेल, तर प्रथम गावाच्या गरजांचा अभ्यास करा. ग्रामीण विकासाच्या योजनांचा लाभ गावपातळीवर देण्यासाठी शासन आणि यंत्रणांनी कितीही नियोजन केले तरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून संबंधित लाभाथ्र्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी आणि गावाचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि गावपातळीवर काम करणा–या कर्मचा–यांची गावाच्या विकासाप्रती मानसिकता असणे महत्वाचे आहे, आपण प्रामाणिकपणे काम केले तर सरपंच आणि सचिव मिळून गावाला विकासाच्या वाटेवर नेऊ शकतो, सर्वसामान्य व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा, आणि पिण्याचे पाणी देणारी व्यवस्था ग्रामपंचायतमधून निर्माण झाली तरच ग्रामविकासाला चालना मिळेल असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.
माजी सभापती व जि.प.सदस्य मुकेश भिसे यांच्या प्रयत्नातुन इसापूर, बाबुळगांव खोसे, हुसनापूर, विजयगोपाल,चोंदी, शिरपूर (होरे) येथे विविध विकास कामाचे भूमीपूजन व लोकार्पन सोहळा खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी जि.प.उपाध्यक्षा सौ. वैशाली ज. येरावार, समाजकल्याण सभापती विजयराव आगलावे, जि.प.सदस्य व माजी सभापती मुकेश भिसे, उपसभापती प.स. युवराज खडतकर, जि.प.सदस्य सुनिताताई राऊत,प.सदस्य शंकरराव उईके, जयंत येरावार, तालुका अध्यक्ष दशरथ भुजाडे, गजानन राऊत, इसापूरच्या सरपंच सौ. प्रणिता आबंटकर, उपसरपंचत करपते, बाबुळगांव खोसेचे सरपंच अमोल आ़त्राम, उपसरंपच गुणवंत चांदेकर, भिडीचे सरपंच सचिन बिरे, उपसरपंच अतुल क्षेत्री, विजयगोपालचे सरपंच व उपसरपंच, चोंदीचे सरपंच संतोशराव मसराम, उपसरंपच दिनेश लोहे, शिरपुरचे सरंपच रविन्द्र भाणारकर, उपसरपंच सौ. राधाबाई लडके, मुरदगाव खोसेचे सरपंज गजानन हिवरकर, लोणी सरपंच वैभव श्यामकुवर, वासुदेवरा वाकुडे व इसापूर, बाबुळगांव खोसे, हुसनापूर, विजयगोपाल, चोंदी, शिरपूर (होरे) ग्रामपंचायतचे सर्व सचिव, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.