Breaking News

जनक्रांती सेना व माँ शारदा पूजा उत्सव समितीचा नावीन्यपूर्ण उपक्रम

Advertisements

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- जनक्रांती सेना वर्धा जिल्हा व माँ शारदा पूजा उत्सव समिती च्या वतीने माता शारदा देवीचे विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करून विसर्जनाला शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली.पोलिस कॉटर एरीकेशन कॉलनी ते पिपरी मेघे येथून आर्वी नाका येथील फुटपाथवरील व्यवसायिकांना मास्क व sanitizer चे वाटप करण्यात आले. जनक्रांती सेनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष सुशांतभाऊ खडसे यांनी त्रिसुत्री नियमाचे पालन करुन आपण कोरोनावर मात कशी करू शकतो यावर नागरिकांना मार्गदर्शन केले व लस नाही निघत जोपर्यंत सावध राहा तोपर्यंत या वाक्याला अनुसरून ही जनजागृती करण्यात आली. या विसर्जन यात्रेला जनक्रांती सेनेचे विदर्भ अध्यक्ष विक्की हातागळे , जिल्हाध्यक्ष सुशांतभाऊ खडसे , उपजिल्हाध्यक्ष प्रसाद कोडगीरवार , जिल्हा सचिव रोशन कुसाळे , शहराध्यक्ष अभिषेक धुर्वे , तालुका अध्यक्ष महेश मसराम , व महिला आघाडी जिल्हा सचिव माधुरी पझारे , उपस्थित होते. मास्क व sanitizer वाटप उपक्रमाला नागरिकांचा व व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व स्थानिक प्रशासनाचे जनक्रांती सेना व माॅ शारदा पूजा उत्सव समितीकडून आभार मानण्यात आले.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

वर्धा लोकसभा क्षेत्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत करावी, उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांच्याकडे खासदार रामदास तडस यांची मागणी

वर्धा लोकसभा क्षेत्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत करावी, उपमुख्यमंत्री मा. …

आर्वी:आमदार दादाराव केचे यांनी रामपुर येथे केली भाजपा शाखा स्थापित

जिल्हा प्रतिनिधी वर्धा;आर्वी:-आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी रामपुर येथे भारतीय जनता पक्ष स्थापित करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *