कारंजा तालुक्यातील मोर्शी गावातील शिवाजीराव देवासे यांच्या राहत्या घराला ३१ अॉक्टोबर २०२० ला घरात कोणी नसतांना अचानक आग लागल्याचे आमदार दादाराव केचे यांना कळता क्षणी कारंजा तालुक्याचे तहसीलदार कुमावत यांना दुरध्वनीने संपर्क करून वस्तुस्थितीची पाहणी करून मोका पंचनामा करण्यास सांगितले होते. दिनांक १ नोव्हेंबर २०२० ला स्वतः आमदार दादाराव केचे यांनी देवासे यांच्या घराची तहसीलदार कुमावत यांच्यासह मोका पाहणी केली.
पाहणी दरम्यान जुन्या पद्धतीच्या लाकडी मौद्याचे घर असल्याने लागलेल्या आगीचे स्वरूप प्रचंड प्रमाणात असल्याने घरातील अन्नधान्य सहीत दैनंदिन जीवनात उपयोगाच्या वस्तूंसह दैनंदिन उपजीविकेचे अॉटोचे इंजन संपूर्णपणे जळून खाक झाले होते. देवासे कुटुंब घरी नसल्याने घरा शेजारील व गावकऱ्यांनी मिळून आग आटोक्यात आणली.
आमदार दादाराव केचे यांनी यावेळी शिवाजी देवासे यांच्या कुटुंबीयांना अन्नधान्य व किराणासह दैनंदिन उपयोगात पडणाऱ्या संपूर्ण वस्तू सुपूर्त करत तहसीलदार कुमावत यांना या कुटुंबाला शासनातर्फे तातडीने मदत करण्यासाठी निर्देशित केले. यावेळी शिरीष भांगे उपाध्यक्ष भाजप वर्धा जिल्हा, मुकुंद बारंगे अध्यक्ष भाजप कारंजा तालुका, मंगेश खवशी अध्यक्ष किसान विकास आघाडी कारंजा तालुका, संजय कदम नगरसेवक कारंजा, बाळासाहेब मोकाद्दम, अनिल वंजारी, किशोर भांगे, चंद्रशेखर नासरे माजी सरपंच मोर्शी, रामदास बोबडे, हरीशचंद्र देवासे यांच्यासह देवासे यांच्या पत्नी दर्शना देवासे, मुली स्नेहल, वैष्णवी, मयुरी व मोर्शी येथील गावकऱ्यांची उपस्थिती होती.