राज्यात 5 दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस
मुंबई,
पुढील चार ते पाच दिवस राज्यातील विविध भागात वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज राज्यातील बहुतांश भागांमध्ये कुठे वादळी वारे तर कुठे पावसाची स्थिती राहणार आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
25 ते 28 एप्रिल या काळात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. 27 आणि 28 एप्रिल रोजी कोकण आणि गोव्यासह उर्वरित मध्य भारतात अवकाळी पाऊस पडू शकतो. सध्या दक्षिण तामिळनाडू आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र या दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे दक्षिणेकडील बहुतांशी राज्यांत अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. उत्तर आणि पूर्वेकडील काही राज्यातंही पावसाचे वातावरण तयार झाले असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
Check Also
नागपूरकर रसिकांना दोन दिवसीय नाट्य मेजवानी
शुक्रवारपासून महावितरणची राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा नागपूर, दि. 6 जुलै 2024:- महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्य नाट्य स्पर्धा नागपूर परिमंडलाच्या यजमान …
नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!
नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …