Breaking News

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना खावटी अनुदान तात्काळ वाटप करावे – चंद्रपूर जिल्हा शेतकरी संघटनेची मागणी 

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना खावटी अनुदान तात्काळ वाटप करावे
* चंद्रपूर जिल्हा शेतकरी संघटनेची मागणी 
चंद्रपूर, दिनांक 9 मे  –
          राज्य शासनाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थी कुटुंबाकरिता चार हजार रुपये प्रती कुटुंब खावटी मंजूर केले आहे. त्यात दोनशे दोन हजार रुपयांचा किराणा ही समाविष्ट आहे. सध्या कोरोनाचा महाभयंकर प्रकोप सुरू असून यामुळे आदिवासी कुटुंब हवालदिल झाली आहेत. त्यांना तातडीने मंजूर झालेले खावटी अनुदान वाटप करावे, अशी लेखी मागणी चंद्रपूर जिल्हा शेतकरी संघटनेने राज्याचे आदिवासी मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.
             सध्या कोरोना प्रकोपात अनुसूचित जमाती, आदिवासी लोकांना रोजगाराच्या कोणत्याही प्रकाराच्या संधी उपलब्ध नाहीत. आदिवासी समाजातील आदिम जमाती मधील बव्हंशी कुटुंबे ही दारिद्र रेषेखालील असून त्यांना मजुरीशिवाय उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. राज्य शासनाने दुसरा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतरही अजून पर्यंत खावटी अनुदान व किराणा साहित्याचे वाटप सुरू केले नाही. म्हणून तातडीने हे वाटप सुरू करावे, अशी लेखी मागणी चंद्रपूर जिल्हा शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अँड. वामनराव चटप,प्रभाकर दिवे, अरुण नवले, ज्योत्स्ना मोहितकर,पोर्णिमा निरांजने,अँड.श्रीनिवास मुसळे, नीळकंठ कोरांगे,तुकेश वानोडे, प्रा.नीलकंठ गौरकर, डॉ.संजय लोहे,अँड.शरद कारेकर,सुधीर सातपुते, प्रा.रामभाऊ पारखी, रघुनाथराव सहारे,दादा नवलाखे,दिनकर डोहे,बालाजी पवार,बळीभाऊ शेळके यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री,अपर आदिवासी आयुक्त व जिल्हाधिकारी,चंद्रपूर यांना पत्राद्वारे ही मागणी केली आहे. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर आणि आदिवासी विकास महामंडळ यांना तात्काळ निर्देश देऊन खावटी अनुदान वाटप करण्याचे निर्देश देण्याची मागणी वजा विनंती शेतकरी संघटनेद्वारे करण्यात आली आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *