Breaking News

वर्धा जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केन्द्राला ऑक्सिजन काँसंट्रॅटेरचे खासदार रामदास तडस यांच्या हस्ते वाटप.

वर्धा जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केन्द्राला ऑक्सिजन काँसंट्रॅटेरचे खासदार रामदास तडस यांच्या हस्ते वाटप.

वर्धा: विदर्भात कोविड-19 चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे खाटा, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची, ऑक्सिजन काँसंट्रॅटेर ची मागणी वाढते आहे. केन्द्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी विदर्भातील सर्व जिल्हयाकरिता मोठी मदत केली आहे.  खासदार रामदास तडस यांनी वर्धा जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केन्द्राकरिता ऑक्सिजन काँसंट्रॅटेरची मागणी केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने वर्धा जिल्हयाकरिता 10 ऑक्सिजन काँसंट्रॅटेर प्राप्त करुन दिले.

आज खासदार रामदास तडस यांनी देवळी येथील प्राथमीक आरोग्य केन्द्राला -2, ग्रामीण रुग्णालयाल भीडी-1, ग्रामीण रुग्णालय पुलगाव-2, प्राथमिक आरोग्य केन्द्र वायफड-1, प्राथमिक आरोग्य केन्द्र आंजी (मोठी)-4 ऑक्सीजन काँसंट्रॅटेर सुपूर्द करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केन्द्र देवळी येथे वैद्यकीय अधिकारी ए. लांडे, उपाध्यक्ष नरेन्द्र मदनकर, जि.प.सदस्य मुकेश भिसे, दशरथ भुजाडे, रवी कारोटकर, सौ. चरडे, डॅा. एन फुलझेले, डॅा. एम वझेकर व प्राथमीक आरोग्य केन्द्रातील कर्मचारी उपस्थित होते.  ग्रामीण रुग्णालय भिडी येथे वैद्यकीय अधिकारी डॅा. राठोड, डॅा. अल्केश कवाडे, जि.प.सदस्य मुकेश भिसे, सरपंच सचिन बिरे, राजु रोकडे, आशीष अतकर, अमोल दोडके तसेच भिडी ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

    ग्रामीण रुग्णालय पुलगाव येथे मा खा रामदास तडस यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ गोपाल नारलवार यांना ऑक्सिजन काँसंट्रॅटेर हस्तांतरीत करण्यात आल्या आणि खासदार रामदास तडस यांनी रुग्णालयाची पाहणी करून ऑक्सिजन मशीन आणि इतर साहित्य लागल्यास त्वरित उपलब्ध करू असे आश्वस्त केले. या यावेळी नगराध्यक्ष सौ शितल संजय गाते, वैद्यकीय अधिकारी डॅा. अमृता पिपंळे, इंजार्च नलिनी राऊत, जि.प.सदस्य मुकेश भिसे, शहर भाजप अध्यक्ष नितीन बडगे, उपाध्यक्ष नप आशिष गांधी, नगरसेवक मंगेश झाडे, राजेश जयस्वाल, आकाश दुबे, राजकुमार पणपलिया, गजेंद्र गालपेलिवार, मानसिंग झांजोटे, विशाल धोपाडे, राहुल काळे, सुजाता वानखेडे आणि कर्मचारी उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केन्द्र वायफड येथे वैद्यकीय डाॅ. आशिष चव्हाण, डॅा. समीर हिवराळे, जि.प.सदस्य मुकेश भिसे, नंदकिशोर झोंटीग, प्रकाश फुलकरी, गजानन धोंमटे, गजानन ठाकुर, हनुमान सोळंकी, लक्ष्मण चैधरी, परीचारीका सारीका भगत व कर्मचारी उपस्थित होते.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *