Breaking News

Vishwbharat

नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवाना दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या प्रयत्नाने अनेक दानशुरानी दिव्यांग बांधवांना केली मदत

नांदेड(दि.7सप्टेंबर):- जागतिक करोना संकटाकाळि दिव्यांग, वृध्द निराधार याना शासन प्रशासन लोकप्रतिनिधी दानशूर मंडळीनी मदत करावी म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी फोनवर विनंती केल्यामुळे दिव्यांग बांधवांच्या प्ररिस्थीची जाण असलेल्या सतत समाजसेवा करणाऱ्या मा विमलताई साळवे यांनी नांदेड शहरातील दिव्यांग बांधवांना राषण किट देऊन माणुसकीचे दर्शन घडविले. अशा संकटकाळी दिव्यांग बांधवांना शासन प्रशासन …

Read More »

वर्धा : कोविड आजाराची रुग्ण संख्या वाढविण्यासाठी रुग्णालयांना दीड लाख रुपये ?,जिल्हा प्रशासनाचा मोठा खुलासा

कोविड आजाराची रुग्ण संख्या वाढविण्यासाठी रुग्णालयांना दीड लाख रुपये मिळण्याच्या चर्चेवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये – असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. वर्धा, जिल्हा प्रतिनिधी:-  प्रति रुग्णामागे   रुग्णालयाला  दीड लाख रुपये   मिळतात म्हणुन  कोविड  आजाराची  रुग्णसंख्या  वाढवून दाखविण्यात येत आहे.  अशी  चर्चा  समाजमाध्यम व नागरिकांमध्ये  आहे. अशा  प्रकारची कोणतीही तरतुद  राज्य  शासनाने  केलेली नाही.  नागरिकांनी अशा   अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. रुग्णाच्या उपचाराकरीता   दीड लाख रुपये देण्याचे   अथवा  मिळण्याचे  कोणतेही निर्देश शासनाकडून नाही.  वर्धा जिल्हयात …

Read More »

पूरग्रस्तांसाठी सुरू आहे संघाचे प्रशंसनीय कार्य

ब्रह्मपुरी(दि.6सप्टेंबर):-कुठल्याही प्रकारच्या आपत्तीच्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आघाडीवर असतात. याचा प्रत्यय ब्रम्हपूरी तालुक्यातील पूरगस्तांच्या मदत कार्यात सर्वांना येत आहे. गोसेखुर्दचे पाणी मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत सोडल्याने आलेले भविष्यातील संकट ओळखून अगदी सुरूवातीपासूनच स्थानिक संघ स्वयंसेवकांनी पूरग्रस्तांच्या मदत कार्यात कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता स्वत:ला मदत कार्यात झोकून दिले आहे. पूरस्थिती बिकट होती. गावागावात पूरग्रस्त अडकून पडले होते. त्यांना भर पूरामध्ये …

Read More »

वर्धा:कोरोना ब्रेकिंग:आज जिल्ह्यात 116 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

वर्धा :- रविवार दि. 6 सप्टेंबर 2020 रोजी जिल्ह्यात 956 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 116 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यात  75 पुरुष आणि 41 महिलांंचा समावेश आहेत. वर्धा तहसीलमध्ये 45 रुग्ण आढळले असून यामध्ये 32 पुरुष तर 13 महिलांचा समावेश आहे.तसेच सेलूमध्ये 7 रुग्ण आढळले असून यामध्ये 5 पुरुष तर 2 महिलांंचा समावेश आहे.तसेच देवळीमध्ये 5 …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात (दि.6सप्टेंबर)24 तासात नव्याने 262 कोरोना पॉझिटिव्ह; पाच कोरोना बाधितांचा मृत्यू

🔺जिल्ह्यात एकुण 3903 बाधित चंद्रपूर(दि.6सप्टेंबर):- जिल्ह्यात 24 तासात नव्याने 262 पॉझिटिव्ह आढळले असून एकूण बाधितांची संख्या 3 हजार 903 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 1 हजार 850 बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात 2007 बाधितांवर उपचार सुरू आहे. गेल्या 24 तासात 5 बाधितांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या 46 झाली असून चंद्रपूर 42, …

Read More »

स्वर्गीय भाऊसाहेब उर्फ भिका दगडू राशिनकर स्मृती माझे बाबा भव्य ऑनलाईन राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

🔹साहित्य क्षेत्रातून लाभला उदंड प्रतिसाद 🔸रत्नागिरीच्या शारदा चिंतामणी व मुंबईच्या कल्पना म्हापुसकर यांची रचना ठरली सर्वोत्कृष्ट बीड(दि.6सप्टेंबर):-साहित्य क्षेत्रातील नावाजलेल्या मराठी साहित्य मंच समूह-१ ,समूह-२ व साहित्य तारांगण समूहाच्या संयुक्त विद्यमाने मराठी साहित्य मंच चे सर्वेसर्वा, मार्गदर्शक व समूह संचालक राज्यस्तरीय कुसुमाग्रज गौरव पुरस्काराने सन्मानित काव्यरत्न प्रा.रावसाहेब राशिनकर (साहेब) व महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य संपर्क प्रमुख तथा दशभुज फाउंडेशन महाराष्ट्र या …

Read More »

सामान्य रुग्णालयात गोंधळ सुरू कोरोनाने एकाचा मृत्यू, मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कोविड सेंटर समोर गोंधळ

चंद्रपूर(६ सप्टेंबर २०२०) : जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनाच्या नावाची दहशत प्रशासनातर्फे केली जात आहे असता थेट आरोप आज कोरोनाने मृत पावलेल्या नागरिकाच्या नातेवाईकांनी केली. केळझर येथील आनंद विद्यालयाचे अध्यक्ष शिवराम शेंडे यांना 3 दिवस आधी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, 3 दिवस ते कोरोना निगेटिव्ह होते परंतु चौथ्या दिवशी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला व त्यांचा मृत्यू झाला. आधी …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अन्नधान्य किटचे वाटप

पोंभूर्णा(दि.6सप्टेंबर):;राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका पोंभूर्णा तर्फे गंगापूर व टोक येथील नागरिकांना ५० अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नावेने या दोन्ही गावात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पुनर्वसन करण्यात यावे ही मागणी त्यांनी केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपली मागणी रास्त असून दिवसेंदिवस या ठिकाणी राहणे पुरपरिस्थितीने शक्य होणार नाही असे सुतोवाच आजच्या सभेत व्यक्त केले. शासनाकडे पाठपुरावा करून …

Read More »

जिल्ह्यात मोहफुलावर आधारित दारू कारखाना सुरू करा

गडचिरोली(दि.6सप्टेंबर):- या जंगलव्याप्त जिल्ह्यात मोहफुलांचे उत्पादन भरपूर प्रमाणात होत असून त्यामानाने त्याला भाव मिळत नाही.त्यामुळे मोहफुलांचे खुली बाजारपेठ करून मोहफुलावर आधारीत दारूचा कारखाना उभारण्यात यावा मिळणाऱ्या उत्तपणातून जिल्ह्याच्या विकासात भर घालावी अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चन्नावार यांनी केली.महाराष्ट्र शासनाने गडचिरोली जिल्ह्यात1993 पासून दारूबंदी जाहीर केली.शासनाला हा निर्णय घेण्यास बाध्य करण्यासाठी सर्चचे प्रणेते डॉ. अभय बंग असंख्य कार्यकर्त्यांची मनस्वी …

Read More »