Vishwbharat

महाराष्ट्राची लालपरी आज दि.18 पासून पूर्ण क्षमतेने धावणार : मात्र कोरोनासंदर्भातील नियम बंधनकारक राहतील

वर्धा प्रतिनिधी :-  मिळालेल्या वृत्तानुसार कोरोनामुळे संकटात सापडलेली महाराष्ट्राची लालपरी अर्थात एसटी बस उद्यापासून पूर्ण आसन क्षमतेने धावणार आहे उद्यापासून म्हणजे 18 सप्टेंबर पासून राज्यभरात पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ ला राज्य शासनाकडून मिळाली असून मात्र प्रवाशाना कोविड नियम पाळून प्रवास करावा लागेल प्रत्येक प्रवाशाना प्रवासादरम्यान मॉस्क व सॅनिटाईजरचा वापर करणे बंधनकारक असणार आहे …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात (दि.17सप्टेंबर) रोजी गेल्या 24 तासात 294 कोरोना बाधित – सहा कोरोना बाधितांचा मृत्यू

🔺बाधितांची एकूण संख्या 6976 चंद्रपूर(दि.17सप्टेंबर):-चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 294 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 हजार 976 झाली आहे. यापैकी 3 हजार 836 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 3 हजार 45 कोरोना बाधितावर सध्या उपचार सुरू आहेत. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 6 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, …

Read More »

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात कोरोनाबाधित 115 तर मृत्यू 5

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- गुरुवार दि.17 रोजी आज 553 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 115 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 66 पुरुष तर 49 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज 5 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (वर्धा-  62, 67,72, 56,67  )यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 73 झाली असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू -72 …

Read More »

देवळी येथे पंतप्रधान मा. श्री. नरेन्द्रजी मोदी यांचा 70 वा वाढदिवस हा ‘‘सेवा सप्ताह’’ अंतर्गत विविध उपक्रम घेऊन साजरा

  देवळी मिरन्नाथ मंदिर परिसरात मध्ये स्वच्छता मोहीम, मास्क वाटप, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा घेण्यात आली वर्धा प्रतिनिधी : देवळी: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जे. पी. नड्डा यांनी आदरणीय लोकप्रीय पंतप्रधान मा. श्री. नरेन्द्रजी मोदी यांचा 70 वा वाढदिवस हा 14 ते 20 सप्टेंबर 2020 पंर्यत ‘‘सेवा सप्ताह’’ साजरा करण्याच्या सुचना केल्या यामध्ये वंचितांना मदत, गरीबांना फळाचे वाटप, प्लाझमा दान, …

Read More »

वर्धा: कोरोनाचा कहर सुरुच : आज जिल्ह्यात कोरोनाबाधित 132 तर मृत्यू 7

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- बुधवार दि.16 रोजी आज 706 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 132 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 87 पुरुष तर 45 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंची सर्वात मोठी मृत्यू संख्या आज सलग दुसऱ्या दिवशीही  झाली आहे . आज जिल्ह्यात 7 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे.यामध्ये (वर्धा- पुरुष 35,  60, 52, 50, 75,महिला 28, हिंगणघाट महिला 34 )असून जिल्ह्यात एकूण …

Read More »

वर्धा :- सोयाबीन उत्पादक शेतक-यांचा प्रश्न लोकसभेत खासदार रामदास तडस यांनी उपस्थित केला मुद्दा

* खासदार रामदास तडस यांनी अतारांकित प्रश्न संख्या 428 व नियम   377 अंतर्गत  उपस्थित  केला मुद्दा. * केन्द्रीय कृषि एवं किसान कल्याण मंत्री श्री. नरेन्द्र सिंह तोमर जी   यांनी दिले  अतारांकित  प्रश्नाला उत्तर. * नियम 377 अंतर्गत सोयाबीन उत्पादक शेतक-यांना हेक्टरी रु. 50   हजार रुपये मदत  करण्याची मागणी दिल्ली/वर्धा : शेतात पिकणारे धान्य हेच शेतक-याच्या उदरनिर्वाहाचे साधन असते. महाराष्ट्रात कापसानंतर सर्वात जास्त …

Read More »

आय.टी.आय. उर्त्तीण व्यवसाय ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहिर

वर्धा प्रतिनिधी : दि.16 : –  शिकाऊ  उमेदवारी योजने अंतर्गत सप्टेंबर 2020 मध्ये घेण्यात होणा-या 110 व्या अखिल भारतीय  व्यवसाय ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी हॉलतिकिटवर दिलेल्या तारीख व वेळेनुसार   परीक्षेच्या 45 मिनिट आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे असे आवाहन  मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्राचे सहाय्यक सल्लागार (तंत्र)  यांनी केले आहे. ट्रेड थेअरी, येम्लायबीलीटी स्कील (ES), वर्कशॉप कॅलकुलेशन आणि विज्ञान  या विषयाचे लिखित …

Read More »

वर्धा :- वाबगांवात माझे कुटुंब .माझी जबाबदारी कार्यक्रमाला सहकार्य करा – सरपंच निकीता शेळके

वर्धा प्रतिनिधी :- महाराष्ट्र  शासनाने जाहीर केलेले *माझे कुटुंब -माझी जबाबदारी* या महत्त्वाचे कार्यक्रमला गावातील नागरीकानी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत वाबगांव सरपंच निकीता शेळके यांनी केले . प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ अंतर्गत *माझे कुटुंब माझी जबाबदारी*  या कार्यक्रमाची पुर्व तयारी वाबगाँव येथील १५ सप्टेंबर रोजी  सभेत उदघाटन करताना बोलत होत्या . तर सभेचे अध्यक्षतेस्थानी माजी सरपंच शुभागी गायकवाड होत्या …

Read More »

कारंजा पंचायत समितीचे वादग्रस्त गटविकास अधिकारी उमेश नंदागावळी यांची बदली

वर्धा प्रतिनिधी :-  कारंजा पंचायत समितीचे वादग्रस्त गटविकास अधिकारी उमेश नंदागावळी यांची बदली गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथे करण्यात आली असून ग्रामविकास विभागाने नांदगावळीसह राज्यातील पंचायत समितीत कार्यरत असलेल्या 46 गट विकास विकास अधिकारी यांची बदली करण्यात आली आहे.कारंजा घाडगे येथील गटविकास अधिकारी यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली असल्याचे माहिती मिळाली आहे.

Read More »