Breaking News

Vishwbharat

वाहतुकीसंदर्भात उपाययोजनासाठी राज्यस्तरीय कृतीदल

मुंबई : कोविड-19 या विषाणूमुळे होणारा संसर्ग टाळण्याकरिता वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी विविध माल वाहतूक संघटना व नागरी परिवहन उपक्रम यांच्या प्रतिनिधींसह परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृतीदल (Transport Task force) स्थापन करण्यात आले आहे.                                                  …

Read More »

अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार

मुंबई : सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून 1 जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603 क्रमांकाचे दालन व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे.                                              …

Read More »

सतराव्या दिवशी पेट्रोल-डिझेल किंमतीत 36 पैशांचाच फरक

नवी दिल्ली : आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत फक्त 36 पैशांचाच फरक राहिला. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील अंतर एवढं कमी होण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.                                                                      …

Read More »

५० लोकांच्या मर्यादेत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी

मुंबई : कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊनदरम्यान गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.                                            …

Read More »

६२ हजार ८३३ रुग्णांवर उपचार सुरू : आरोग्यमंत्री 

मुंबई : कोरोनाच्या ३२१४ नवीन रुग्णांचे आज निदान झाले असून सध्या राज्यात ६२ हजार ८३३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज १९२५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६९ हजार ६३१ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५०.०९ टक्के एवढे झाले आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.              …

Read More »

वीज बिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत : ऊर्जामंत्री 

मुंबई : लॉकडाऊनच्या कालावधीनंतर सध्या मीटर रिडींग घेऊन जून महिन्याचे वीजबिल देण्यात येत आहे. महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत उपलब्ध आहे व स्थानिक कार्यालयांकडून वीजबिलांचे सुलभ हप्ते पाडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. महावितरणच्या फोर्ट येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.              …

Read More »

आई रुक्मिणीची पालखी यंदाही पंढरपूरला जाणार: पालकमंत्री ॲड. ठाकूर

अमरावती : माता रुक्मिणीचे माहेर असलेल्या कौंडण्यपूर येथील आई रुक्मिणीची पालखी यंदाही आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणार आहे. सव्वाचारशे वर्षांची अखंडित परंपरा असलेल्या या पालखीत कोरोना संकटामुळे खंड पडणार नाही. आवश्यक ती दक्षता घेऊन पालखी पंढरपूरकडे रवाना होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी केले.                                  …

Read More »

बनावट बियाणे कंपन्यांवर कारवाई करा : पटोले

नवी दिल्ली : सदोष खते, बियाणे, कीटकनाशके बनविणाऱ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे केली.                                                              …

Read More »

मोफत अन्नधान्य योजना सुरू ठेवण्याची मागणी करणार : भुजबळ

मुंबई : कोविड – १९ प्रादुर्भावामुळे देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी प्रतिव्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ व प्रतिशिधापत्रिका १ किलो डाळ मोफत वाटप करण्यात येत आहे. मात्र अद्याप कोरोनाचा धोका कायम असल्याने श्रमिकांच्या हाताला काम नाही त्यामुळे या योजनेस जुलै ते सप्टेंबर २०२० या कालावधीत …

Read More »

शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार : गृहमंत्री

मुंबई : सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा गंभीर इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.            …

Read More »