आरोग्य

बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार : तपास करा – जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

धुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आहे. ही गंभीर बाब आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने बोगस डॉक्टरांच्या तपासणीसाठी गठित केलेल्या तालुकास्तरीय समिती मार्फत विशेष मोहीम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले. आवश्यक तेथे पोलिस दल व अन्न व औषध प्रशासन विभागाची मदत घेवून सांघिकपणे काम करावे. बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची सुधारित यादी तयार करुन पुढील 15 …

Read More »

लिंबू, संत्र्याची चीनमध्ये वाढली अचानक मागणी…वाचा🍋🍊

चीनमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या बातम्या येत आहेत. यामुळेच तेथील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता आहे. औषधांच्या तुटवड्यासह डॉक्टर्स आणि नर्स यांचाही तुटवडा चीनमध्ये जाणवत आहे. पण दुसरीकडे चीनमधील लोकांनी लिंबू आणि संत्रे खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली आहे. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चीनमध्ये कोरोनाचे नवीन ‘बीएफ 7’ या व्हेरिएंटची घातक लाट …

Read More »

नागपूर हिवाळी अधिवेशन : मास्क बंधनकारक, सर्व शासकीय कार्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र

हिवाळी अधिवेशन असल्याने नागपूरमधल्या सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यासाठी मास्कसक्ती करण्यात आली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांनीही मास्क लावणं बंधनकारक असणार आहे. लवकरच सर्व नागरिकांसाठीही आम्ही असे आदेश काढणार आहोत अशीही माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी एका वाहिनीशी बोलताना दिली. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत नागपूरमध्ये करोनाचे रूग्ण वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर आता चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन शासकीय …

Read More »

‘या’ भाज्या चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

अन्नाची नासाडी टाळण्यासाठी फ्रीज हा एक वरदान म्ह्णून सिद्ध होतो. पण अनेक असे पदार्थ आहेत जे फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याचा उलट प्रभाव होऊ शकतो. अनेकदा आठवडाभर कामात व्यस्थ असणारी मंडळी शनिवार- रविवारी आठवड्याची भाजी, फळे आणून ठेवतात. फ्रीजमध्ये अनेकदा आपण अगदी पद्धतशीर या भाज्या लावून ठेवतो. या भाज्या धुवून, स्वच्छ करून अनेकजण चांगलं प्लास्टिकमध्ये कव्हर करून सुद्धा ठेवतात पण तरीही काहीच …

Read More »

कोरोना : नागपुरात येणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी… वाचा

केंद्र शासनाकडून जारी केलेल्या दिशानिर्देशानुसार आंतरराष्ट्रीय विमानाने नागपूर शहरात येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येईल. तसेच विदेशातून शहरात दाखल होणाऱ्या दोन टक्के प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देशही पालिका आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले. कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या अनुषंगाने आयुक्तांनी संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहात आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली यासंबंधी बैठक …

Read More »

राज्यातून कोरोना हद्दपार, सण-उत्सव धुमधडाक्यात साजरा करा : आरोग्यमंत्री सावंत

चीनमध्ये करोनाचा संसर्ग पुन्हा डोकेदुखी ठरत आहे.यामुळे भारतासह महाराष्ट्रातही चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? याचीही चर्चा सुरू आहे. याबाबत शनिवारी, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रातून कोरोना हद्दपार झाला आहे. आगामी सण, उत्सव, ख्रीसमस आणि नवीन वर्ष धुमधडाक्यात साजरे करा असे वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले. आमदार जयकुमार गोरे यांची …

Read More »

चेहरा दिसेल सुंदर : एका रात्रीत मुरुमं होतील गायब…

चेहऱ्यावर मुरूमांची समस्या तरुणाईमध्ये अधिक आढळून येते. व्यस्त जीवनशैलीमुळे खाण्याच्या पिण्याच्या बदलत्या सवयीमुळे चेहऱ्यावर मुरुम येतात. यासाठी बाजारात अनेक केमिकल उत्पादने असतात. मात्र त्यांचा परिणाम हा कायमस्वरुपी नसतो. मुरुमे घालवण्यासाठी तुम्ही खालील उपाय करु शकता. बर्फ थेरपी चेहऱ्यावर मुरुमे आल्यास त्यावर बर्फ लावणे उत्तम. यामुळे मुरुमांचा लालसरपणा कमी होतो तसेच सूजही कमी होते. बर्फ लावल्याने मुरुमे कमी होण्यास मदत होते. …

Read More »

वजन कमी करण्यासाठी भात की चपाती खावी?

लाईफ स्टाईलमुळे अनेकांना आरोग्या संबंधीत अनेक समस्यांशी सामना करावा लागत आहे. त्यात वजन वाढणे किंवा जाड होण्याच्या समस्या भेडसावत आहेत. अशात अनेक लोक आपलं वजन कमी करण्यासाठी हेल्दी जेवण किंवा जेवण कमी करण्याचा पर्याय निवडतात. परंतु यामध्ये लोकांना एक प्रश्न पडतो की, वजन कमी करण्यासाठी भात कमी खावं की, नेमकी चपाती? बरेच लोक वजन कमी करताना प्रथम चपाती सोडून देतात …

Read More »

मुलांवर होतो पालकांच्या रागाचा गंभीर परिणाम : पालकांनो मुलांशी साधा संवाद

मनुष्य म्हटल्यावर चुका होणार, चीडचीड होणार, राग हा येणारच. मग ती व्यक्ती लहान असो, मोठी असो अगर वयोवृद्ध. मनाविरोधी कोणतीही कृती झाल्यास, दुसऱ्या व्यक्तीने त्रास दिल्यास राग हा येतोच. राग, क्रोध, प्रेम हे जीवनाचा भागच आहेत ते ठराविक काळापुरतेच राहते आणि पुन्हा कमी जास्त होते. रागाचा प्रभाव जरी दिर्घकाळ राहत नसला तरी, रागाच्या भरात हातून भयंकर चुका होऊ शकतात आणि …

Read More »

आंनदवार्ता : आता हजार रुपयांत होणार कॅन्सरवर उपचार

एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला की, त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. केवळ वेदनाच नव्हते तर उपचारांसाठी होणारा खर्च देखील जास्त असून तो प्रत्येकालाच परवडत नाही. मात्र आता या रूग्णांसाठी एक दिलासादायक आणि चांगली बातमी आहे. ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच स्तनांचा कर्करोग आता अवघ्या हजार रुपयांत बरा होणार आहे. मुंबईतील टाटा रुग्णालयात याबाबत महत्त्वाचं संशोधन केलंय. संशोधनाच्या अहवालाअंती योग आणि व्यायाम केल्याने स्तनांच्या कर्करुग्णांत …

Read More »