ऑरेंजसिटी

आमदार प्रतिभाताई धानोरकरांची पंचायत राज समिती, महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या सदस्यपदी नियुक्ती

चंद्रपूर : सामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात मांडून अल्पावधीतच जनसामान्यांच्या आपल्याशा वाटणाऱ्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे नव्या २ जबाबदाऱ्या आल्या आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्यांची पंचायत राज समिती, महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे. महिलाचे व ग्रामीण भागातील सामान्य जनतेचे प्रश्न आमदार प्रतिभाताई धानोरकर नेहमी दूर करीत असतात. मतदार संघातील …

Read More »

एकाच छताखाली कॅन्सर स्क्रिनिंग व लवकर होणार निदान

चंद्रपूर : एकाच छताखाली कॅन्सर स्क्रिंनिंग व निदान करण्याची सोय चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याने चंद्रपूरच्या आरोग्य विकासात भर पडली असल्याचे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ‘स्वस्थ चंद्रपूर कि ऑस्क’ उपक्रमाच्या लोकार्पण प्रसंगी व्यक्त केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अधिष्ठाता डॉ.अरुण हुमणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ भास्कर सोनारकर, जिल्हा प्रकल्प …

Read More »

शनिवारी 132 बाधितांची वाढ

चंद्रपूर,7 नोव्हेम्बर :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 7 नोव्हेम्बर रोजी 16786 झाली आहे. गेल्या 24 तासात 132 नवीन बाधित पुढे आले आहेत.जिल्ह्यात आत्तापर्यंत 13843 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 2691 बाधित उपचार घेत आहे.आतापर्यंत 13843 …

Read More »

मास्क नाही तर प्रवेश नाही’ प्रत्येक व्यापारी आस्थापनेने मोहीम राबवावी: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाईचे संकेत चंद्रपूर दि.6 नोव्हेंबर: जिल्ह्यात कोरोना बाधित होण्याचे प्रमाण पुर्वीपेक्षा थोडे कमी झाले असले तरी कोरोना अद्याप संपलेला नाही, येत्या काही दिवसात सणासुदीमुळे बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढण्याची शक्यता आहे. व्यापारी प्रतिष्ठान व बाजाराच्या ठिकाणी मास्क घालणे, सुरक्षीत अंतर राखणे यासारख्या कोरोना प्रतिबंधंक उपाययोजनांबाबत जनजागृती वाढविण्यासाठी व्यापारी वर्गाचे सहकार्य महत्वाचे असल्याने प्रत्येक दुकाणात …

Read More »

उमेद कर्मचारी यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

ग्रामसंघ, प्रभागसंघाच्या महिलांही होणार सहभागी चंद्रपूर, (दिनांक ०४) : लाखो महिलांच्या विरोधानंतरही केंद्रपुरस्कृत उमेद अभियानाचे सरकारने खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात जिल्हयातील हजारो समुहांसोबत, प्रेरक व्यक्ती व कर्मचाऱ्यांनी उदयापासून दिनांक 5 नोव्हेंबरपासून कामबंदचा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील लाखो महिलांचा आधार असलेल्या उमेद अभियानाचे राज्य सरकारने मागील वर्षभरापासून टप्याटप्याने खच्चीकरण केले. ग्रामीण महिलांना मिळणारा खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूक …

Read More »

जिल्ह्यातील 25 धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता

  चंद्रपूर दि.30 ऑक्टोबर: केंद्र सरकारच्या हंगाम 2020-21 किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात 25 धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंजुरी दिलेली आहे. जिल्ह्यात तालुका निहाय खरेदी केंद्र उपलब्ध करून दिले असल्याने शेतकऱ्यांना आपला धान जवळच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करून विकणे सोयीचे झाले आहे. हि लागतील कागदपत्रे: शेतकऱ्यांनी केंद्रावर नोंदणी करण्याकरिता चालू वर्षाचा सातबारा, आधार कार्डची झेरॉक्स व …

Read More »

उमेदच्या 10 लाख महिला रस्त्यावर उतरणार; मुकमोर्चातुन सरकारचा निषेध नोंदविणार

🔸 मुकमोर्चातुन सरकारचा निषेध नोंदविणार   🔸 दिनांक 12 ऑक्टोबर ला राज्यातील 10 लाख महिला मुकमोर्चा काढून शासनास जाब विचारणार   चंद्रपूर : महिलांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला वेगळी दिशा देणारे उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आता बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने  अभियानाला जोडलेल्या 50 लाख महिलांच्या जीवनोन्नतीचा मार्ग आणखी  खडतर झाला आहे. शासनाकडून मिळणारा निधी …

Read More »

जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश !

माजी खासदार नरेश पुगलिया व इतर दोघांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका ! चंद्रपूर महानगरपालिका, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांना नोटीस ! नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध आरोग्य सुविधांचा अभाव व अन्य अनेक समस्या असल्यामुळे कोरोना रुग्णां चे हाल होत आहेत, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात …

Read More »

वरोरा विधानसभेत युवक काँग्रेसच्या नव्या नियुक्त्या

▪विधानसभा अध्यक्षपदी शुभम चीमुरकर ▪तालुका अध्यक्ष दडमल तर         शहराध्यक्षपदी लोहकरे. वरोरा_ अखिल भारतीय युवक कॉंग्रेसच्या वरोरा  विधानसभा अध्यक्षपदी शुभम चिमुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हरीश कोत्तावार यांनी केली असून, नियुक्तीचे पत्र खा.बाळूभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते देन्यात आले. वरोरा तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी देवेंद्र दडमल (खेमजई) यांची …

Read More »

ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्तांना महारोगी सेवा समिती, वरोरा, आनंदवन कडून मदत

वरोरा-  वैनगंगा नदी ला आलेल्या पुरामुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक गावे पुरग्रस्त झाली आहेत. तेथील नागरिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. अश्याच ब्रम्हपुरी तालुक्यातील  पूरग्रस्त पारडगाव व बेटाळा या दोन गावातील नागरिकांना गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली द्वारा करण्यात आलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत  *महारोगी सेवा समिती, वरोरा संचालित  आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन* च्या वतीने 60 कुटुंबाना अन्नधान्य किट ज्यात एकूण दहा किराणा वस्तूंचा समावेश  …

Read More »