Breaking News

औरंगाबाद

रस्त्याच्या प्रकरणात सोयगाव तहसीलमध्ये विष घेण्याचा प्रयत्न

औरंगाबाद : कोणतीही सूचना व सुनावणीची नोटीस न देताच शेतातून बेकायदेशीर रस्ता दिल्याचा निकाल ऐकून ४५ वर्षीय महिलेने सोयगाव तहसील कार्यालयात कीटकनाशक प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस पोहचले.गंभीर महिलेला तातडीने उपचारासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.चंद्रकालाबाई पांडुरंग शिंदे (४५, रा. पळाशी, ता. सोयगाव)असे हृदयविकाराच्या झटका येऊन बेशुद्ध महिलेचे नाव आहे. प्रकरण असे… पळाशी शिवारात …

Read More »

औरंगाबादेत ‘स्वाइन फ्लू’चा धोका!

औरंगाबाद : शहरात कोरोनानंतर आता स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. असे असताना मात्र महापालिकेने स्वाइन फ्लूसंदर्भात चाचण्या घेतल्याच नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, स्वाइन फ्लू व कोरोना संसर्गाची लक्षणे सारखीच आहेत. याविषयी विचारणा करताच आता शनिवारपासून चाचण्या घेतल्या जातील, असे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. कोरोना पाठोपाठ राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने …

Read More »

जायकवाडी धरणाजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या मुख्य प्रवेशद्वारातून गुरुवारी २.५ फूट उंचावून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. शुक्रवारी सायंकाळी आवक वाढल्याने यंदा पहिल्यांदाच २७ पैकी पाच आपत्कालीन दरवाजांसह २५ दरवाजे ४ फुटांनी उंचावून ७९ हजार १२४ क्युसेक विसर्ग गाेदावरीपात्रात सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडीचा पाणीसाठा सध्या ९८.३५ टक्क्यांवर आहे. शुक्रवारी सकाळी धरणाचे १० ते २७ असे …

Read More »

पाऊस रुसलेलाच, बळीराजा चिंतेत औरंगाबाद जिल्ह्यात बाप्पाचे जल्लोषात आगमन

औरंगाबाद : जिल्ह्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, जिल्ह्यात अजून ३९ टक्के तूट आहे.२४ जून रोजी ५१.२ मिमी तर ४ ऑगस्टला ४७.५ मिमी, ७ ऑगस्ट रोजी २२ मिमी, १५ ऑगस्ट रोजी १०.५ पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाने दडी मारली होती.१ जून ते ३१ ऑगस्टपर्यंत एकूण ४८६.२ मिमी पावसाची नोंद आहे. आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली, असे म्हणता येईल. मात्र …

Read More »