विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर, कन्नड व बीडच्या गेवराई तालुक्यात भगर खाल्ल्याने १५६ जणांना विषबाधा झाली. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. वैजापूर तालुक्यात विषबाधा झालेल्यांची संख्या ११८, कन्नडमध्ये १२ तर गेवराई तालुक्यातील २६ जणांवर उपचार सुरू आहेत. वैजापुरात सोमवारी (२६ सप्टेंबर) रात्री ९ ते मंगळवारी पहाटेपर्यंत वेगवेगळ्या गावातून बाधित रुग्णांच्या संख्येत सकाळपर्यंत वाढ झाली. विषबाधा झालेल्यांमध्ये महिलांची …
Read More »औरंगाबाद : मुख्यालयी रहा, अन्यथा कारवाई, वाद वाढणार
विश्व भारत ऑनलाईन : शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याचा विषय चांगलाच गाजत आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचा आग्रह केल्यानंतर काही संघटना न्यायालयात गेल्या होत्या. काही काळ थांबलेला मुद्दा आमदार प्रशांत बंब यांच्या मुख्यालयी राहण्याच्या आग्रहाने पुन्हा सुरु झाला आहे. त्यातच मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी शासनाच्या मुख्यालयी राहण्याच्या विविध आदेशाचा संदर्भ देत अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे …
Read More »औरंगाबादला मिळाला २२ वर्षानंतर स्थानिक पालकमंत्री ; संदीपान भुमरेंकडे जबाबदारी
विश्व भारत ऑनलाईन : राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या रुपाने औरंगाबाद जिल्ह्याला गेल्या २२ वर्षात पहिल्यांदाच स्थानिक पालकमंत्री लाभले आहेत. याआधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या, नंतर भाजप-शिवसेना युती सरकारच्या आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातही जिल्ह्याला जिल्ह्याबाहेरचे पालकमंत्री देण्यात आले होते. राज्यात १९९५ ते १९९९ या काळात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. त्यावेळी औरंगाबादच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी औरंगाबादचे स्थानिक आमदार चंद्रकांत …
Read More »जुनी पेन्शन देणाऱ्यालाच मतदान, संघटना आक्रमक
विश्व भारत ऑनलाईन : जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करण्यासाठी राज्य कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्व संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य अशी रॅली काढण्यात आली .यावेळी भडकल गेट ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचे रूपांतर नंतर छोट्या सभेत झाले. यावेळी ‘जे सरकार आम्हाला पेन्शन देईल त्यांनाच आम्ही मतदान करु’, असा इशारा यावेळी कर्मचारी संघटनांनी …
Read More »अतिवृष्टीतून औरंगाबाद जिल्ह्याला वगळले,शेतकऱ्यांमध्ये रोष
विश्व भारत ऑनलाईन : जालना,परभणी,हिंगोली,नांदेड ,लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त झाली आहे. मात्र, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्याला नुकसानभरपाईच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. विशेष औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतजमीन वाहून गेली आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. असे असतानाही औरंगाबाद व बीड जिल्ह्याला …
Read More »सोयगाव, कन्नडला पावसाने झोडपले : शेतकरी आर्थिक संकटात
विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडच्या पिशोर आणि सोयगावच्या तालुक्यातील बनोटी भागात ढगफुटीदृश्य मुसळधार पाऊस झाल्याने पुर्णा – नेवपुर, अंजना-पळशी, वाघदरा यासह परिसरातील छोटी पाझर तलाव ओसंडून वाहत आहेत. यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याची प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत. सोयगाव तालुक्यातील बनोटी, किन्ही, वडगाव, दस्तापूर, गोंदेगाव,उप्पलखेडा, मोहळाई भागात कापुस आणि अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अंजना -पळशी नदिपात्रातील …
Read More »औरंगाबाद : अधिकाऱ्याचे अपहरण, आरोपी अटकेत
विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबाद जिल्ह्यातील इब्राहिमपूर या गावातून शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राज्याच्या उद्योग मंत्रालयातील निवृत्त अधिकारी विश्वनाथ लक्ष्मण राजळे (६०) यांचे 4 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस पथकाने बदनापूर तालुक्यातील दावलवाडी शिवारातील एका पेट्रोल पंपावर रात्री ९ वाजेच्या सुमारास राजळे यांची सुटका करून सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले. विकास भगवान खरात(२२), पांडुरंग विष्णू …
Read More »मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन विशेष, सिंचनाची श्वेतपत्रिका काढा-कारेमोरे
विश्व भारत ऑनलाईन : राज्यात सर्वाधिक धरणे मराठवाड्यात आहेत. येथे किमान दहा लाख हेक्टर जमिनीचे सिंचन होणे अपेक्षित आहे. मात्र, दाेन ते तीन लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येते. फक्त कागदावरच. पाण्याअभावी शेतकरी आत्महत्याग्रस्त ठरलेल्या मराठवाड्याच्या सिंचनप्रश्नावर मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी केली आहे. मराठवाड्यात पाणी स्थिती …
Read More »अरे देवा!औरंगाबादमध्ये रस्ता दुरावस्थेचा फटका पार्थिवालाही
विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबाद जिल्ह्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. याबाबतची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतदेह ट्रॅक्टरमध्ये नेत असताना खराब रस्त्यामुळे ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. या घटनेमुळे अखेरच्या प्रवासातही नरकयातना व अवहेलना सोसाव्या लागल्याचे दिसत आहे. खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील ही हृदयद्रावक घटना आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद जवळील मत्तेवाडी येथील नागरिकांना आयुष्याच्या अखेरचा प्रवासही खडतर करावा लागत …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबादेत, पैठणला सभा
विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोमवारी औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर आज दुपारी साडेबारा दरम्यान ते शहरात दाखल होतील. त्यानंतर ते मंत्री संदीपान भुमरे यांचे मतदारसंघ पैठणमध्ये सभा घेतील. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री दुसऱ्यांदा औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडून त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. असा कार्यक्रम दुपारी 12 दरम्यान शिंदे हे …
Read More »