दहावीचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात – वेळेत होणार अकरावीचे प्रवेश मुंबई, कोरोना महामारीमुळे दहावीची परीक्षा रद्द झाली असली तरी निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात लावून अकरावीचे प्रवेश वेळेवर करण्याचे शिक्षण विभागाने ठरवले आहे. या दिशेने शिक्षण विभागाने कामाला सुरुवात केल्याची माहिती आहे. यंदा दहावीला 16 लाख विद्यार्थी बसले होते. हे विद्यार्थी परीक्षा न देता पुढच्या वर्गात जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी दहावीची …
Read More »शाळांनी साहित्य विक्रिचा गोरखधंदा बंद करावा – विदर्भ पालक संघटनेची मागणी
शाळांनी साहित्य विक्रिचा गोरखधंदा बंद करावा – विदर्भ पालक संघटनेची मागणी नागपूर, शाळांनी विद्यार्थ्यांना पुस्तक, वही आणि इतर शालेय साहित्य विकण्याचा जो गोरखधंदा सुरू केला आहे तो तत्काळ बंद करावा अशी मागणी विदर्भ पालक संघटनेचे अध्यक्ष संदीप अग्रवाल यांनी केली आहे. एका प्रसिद्धी पत्रकात अग्रवाल म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून खाजगी शाळांद्वारे शालेय पुस्तके आणि साहित्यांच्या नावावर पालकांकडून कोट्यवधी …
Read More »वीर सावरकर आज जीवित होते… या विषयावर व्याख्यान
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ मे रोजी स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त वीर सावरकर आज जीवित होते… या विषयवार व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. वीर सावरकर आज जीवित होते… या विषयावर प्रा. डॉ. फिरोज अहमद बख़्त (कुलगुरू, मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ, हैद्राबाद) हे या विषयावर संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक मोडक (कुलपती गुरु घासीदास केंद्रीय …
Read More »दहावीच्या परीक्षेबाबत पुढील आठवड्यात निर्णय
पालकांना त्यांच्या पाल्यांबद्दल चिंता वाटणार नाही आणि न्यायालयाच्या निकालाचा अवमान होणार नाही, असा निर्णय घेतला जाईल.’’ पुणे : दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात मुख्यमंत्री, राज्याचे महाधिवक्ता, शिक्षण सचिव यांच्याशी चर्चा करून पालकांना विद्यार्थ्यांबाबत काळजी वाटणार नाही आणि न्यायालयाच्या निकालाचा अवमान होणार नाही, अशा पद्धतीने निर्णय घेऊ, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी …
Read More »परीक्षा शुल्क माफ करा, अन्यथा आंदोलन – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा इशारा
चंद्रपूर, विद्यापीठाने उन्हाळी परीक्षा व महाविद्यालयीन शुल्क माफ करावे, अन्यथा आभासी पद्धतीने आंदोलन करू, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिला आहे. मागण्यांचे निवेदन विद्यापीठाच्या ई-मेल आयडीवर पाठविण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढले आहे. राज्यासह जिल्ह्यात टाळेबंदी लागू आहे. त्यामुळे पालकांच्या हाताला काम नाही. परिणामतः सर्वच घटकांतील लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या बिकट स्थितीत विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय शुल्क …
Read More »पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली
पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली पुणे- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 23 मे रोजी ही परीक्षा होणार होती. यापूर्वी 25 एप्रिल रोजी होणारी परीक्षा कोरोनाच्या संसर्गामुळे 23 मे रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम असल्याने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी आणि …
Read More »पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द,पुढील वर्गात प्रवेश
पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द मुंबई- शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी त्यांनी ही माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या, राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत आपल्याशी संवाद साधत असताना, इयत्ता पहिली ते …
Read More »शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाच्या हक्कांची पूर्तता करा- जिल्हाधिकारी
चंद्रपूर, दि. 6 मार्च : शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने 1 ते 10 मार्च या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली आहे. यात 6 ते 14 वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण केले जाणार असून 100 टक्के बालकांना शाळेच्या प्रवाहात दाखल करून त्यांच्या शिक्षणाच्या हक्कांची पूर्तता करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. जिल्ह्यातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या …
Read More »आंबेडकरी विचारवंत प्रा. सुशीला मूल-जाधव यांचे निधन
नागपूरः ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक विचारवंत, लेखिका प्रा. सुशीला मूल -जाधव (वय ८१) यांचे बुधवार, १६ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास स्थानिक कामठी मार्गावरील व्हिनस हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. प्रा. मूल-जाधव या काही दिवसांपासून नागपूर येथे राहत होत्या. २९ ऑगस्ट रोजी कोव्हिड-१९ आजारामुळे त्यांना कामठी मार्गावरील आशा …
Read More »आय.टी.आय. उर्त्तीण व्यवसाय ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहिर
वर्धा प्रतिनिधी : दि.16 : – शिकाऊ उमेदवारी योजने अंतर्गत सप्टेंबर 2020 मध्ये घेण्यात होणा-या 110 व्या अखिल भारतीय व्यवसाय ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी हॉलतिकिटवर दिलेल्या तारीख व वेळेनुसार परीक्षेच्या 45 मिनिट आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे असे आवाहन मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्राचे सहाय्यक सल्लागार (तंत्र) यांनी केले आहे. ट्रेड थेअरी, येम्लायबीलीटी स्कील (ES), वर्कशॉप कॅलकुलेशन आणि विज्ञान या विषयाचे लिखित …
Read More »
विश्वभारत News Website