Breaking News

विदर्भ

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे PWD मंत्री संतापले

शहरातील रस्त्यांची दुरावस्था बघून ‘ रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते ‘ या शब्दात राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच रस्त्यांची अर्धवट कामे तत्काळ पूर्ण करावी आणि ताबडतोब खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले. राज्यमंत्री नाईक यांनी शासकीय विश्रामगृह येथे विविध विभागाचा आढावा घेतला. यावेळी …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात भूकंप : पण, प्रशासन म्हणते…!

चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुका परिसर ह्या ठिकाणी भूकंपाचे केंद्रबिंदू आहे. ३.२ रिश्टरचे भूकंप नोंद झाल्याची माहिती भूकंप अँप द्वारे प्राप्त झाली. त्याच वेळी वरोरा परिसरातील नागरिक विशेषतः मार्दा, एकोना गावातील नागरिक , पोलीस पाटील , तलाठी त्यांच्यामार्फत खात्री केली. भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे सांगण्यात आले. तसेच सदर परिसरात वेकोली खदान …

Read More »

खूप झाले उत्सव, महोत्सव : आता रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष द्या!

उत्सव, महोत्सव, सभा, संमेलन, लोकार्पण, उद्घाटन, बैठका, कीर्तन, भजन पुरे झाले, आता मृत्यूचे सापळे ठरणाऱ्या खड्डेयुक्त रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष द्या, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि अ.भा. विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाज माध्यमाद्वारे स्वपक्षीयांसह काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनाही खडेबोल सुनावले आहे.   शहरातील महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी या दोन मार्गांचे डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन महिन्यांपूर्वी केले होते. मात्र आजमितीस या …

Read More »

गोंदिया विमानतळावरून इंदूर,दिल्ली,बंगळुरू विमानसेवा

गोंदिया जिल्ह्यातील बिरसी येथील विमानतळावरून सध्या इंडिगोची गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती ही विमानसेवा सुरू आहे. यानंतर १६ सप्टेंबर २०२५ पासून गोंदिया-इंदूर-बेंगळुरू या मार्गावर प्रवासी विमानसेवेला प्रारंभ होणार आहे. तर गोंदिया-दिल्ली प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी बालाघाट चे खासदार भारती पारधी यांच्या मागणी पत्रा नंतर केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे या मार्गावर ही लवकरच गोंदियाहून प्रवासी विमान सेवेला प्रारंभ होणार …

Read More »

विदर्भातील सर्व बार बंद होणार? : मद्यप्रेमींची चिंता वाढली

शासनाच्या मद्य विक्रीवरील धोरणामुळे हॉटेल व्यवसाय बंद पडण्याचा धोका निर्माण झाला असून त्याविरोधात लढा देण्याचा निर्णय बार संचालकांनी घेतला आहे. येत्या दहा दिवसांत सरकारने अन्यायकारक मूल्यवधित कर (व्हॅट) रद्द न केल्यास विदर्भातील सर्व बार चालक आपले व्यवसाय बेमुदत बंद ठेवतील, असा इशारा सरकारला देण्यात आला आहे. अमरावती परमीट रूम असोसिएशनचे अध्यक्ष नितीन मोहोड यांनी ही माहिती दिली आहे.   राज्य …

Read More »

PWD, नागपुरातील दुय्यम निबंधकाकडून राष्ट्रध्वज फडकविताना नियमभंग

स्वातंत्र्य दिनाच्या वेळी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील भगतसिंग चौक येथे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) इमारत व दळणवळण विभागाच्या (B&C) विश्राम गृह येथील राष्ट्रध्वज फडकविताना गंभीर नियमभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच नागपुरातील महाल येथील दुय्यम निबंधकाकडून राष्ट्रध्वज फडकविताना नियमभंग झाल्याचे समजते. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. भारतीय राष्ट्रध्वज संहिता व केंद्रीय गृहमंत्रालयाच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचनांनुसार, …

Read More »

भर दिवसा रस्त्यावर आला वाघ

भर दिवसा रस्त्यावर आला वाघ गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील साकरीटाेला-रामपूर-अंजोरा मार्गावर शुक्रवार २० जून रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास एक वाघ आढळला.   पाच ते दहा मिनिटे या मार्गावर या वाघाचा मुक्त वावर होता. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर या वाघाने रस्त्यालगत असलेल्या कालव्याकडे धाव घेतली. गावकऱ्यांची लगेच याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना …

Read More »

विदर्भात पावसामुळे सतर्कतेचा इशारा

हवामान विभागाने एकीकडे राज्यात पावसाला ‘ब्रेक’ लागणार असे सांगितले असले तरीही दुसरीकडे विदर्भात मात्र सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामानात झालेला बदल त्यासाठी कारणीभूत असून राज्यात अशी बेभरवश्याची स्थिती निर्माण झाली आहे. राजस्थान परिसरात निर्माण झालेल्या ‘सायक्लोनिक सर्क्युलेशन’मुळे आणि उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील चार दिवस पावसात चढ-उतार पाहायला मिळणार आहेत. केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात …

Read More »

कांद्या सडला : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका हा कांद्याचे कोठार समजला जातो. पण, हे कोठार आता अवकाळी पावसाने चिंब झाले आहे. शेतातील कांदा बुडाला आहे. अवघ्या सात दिवसात कांदा काढणीचे काम सुरू होणार होते. पण, पावसाने होत्याचे नव्हते केले.   आष्टी तालुक्यात लहान आर्वी, आष्टी, तळेगाव या तीन गावात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन होते. एकरी दीडशे क्विंटल त्पादन घेतले जाते. या शेतकऱ्यांसाठी हे …

Read More »

वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार : परिसरात दहशत

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा (माल)च्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार झाल्या. मेंढा (माल) येथील शुभांगी मनोज चौधरी (३८), कांताबाई बुधा चौधरी (६०) आणि रेखा शालिक शेंडे (४८) अशी मृत महिलांची नावे आहेत. याशिवाय एक महिला जखमी आहे.   सध्या तेंदूपत्ता संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक महिला आणि पुरुष यासाठी जंगल परिसरात जात असतात. आज, शनिवारी सकाळच्या …

Read More »