खासदारांकडून यांनी नेरी व मीरापूर ता. जि. वर्धा सोयाबीन उत्पादक नुकसानग्रस्त शेतांची पाहणी वर्धा प्रतिनिधी :सचिन पोफळी :- वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर उंड अळी, खोड अळी व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे शेतक-यांचा पेरणीचा खर्च पण निघणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन उत्पादक शेतक-यांची अडचण लक्षात …
Read More »सामान्य रुग्णालय परिसरात “सखी वन स्टॉप सेंटर” कार्यान्वित
वर्धा, दि 31: जिल्हा प्रतिनिधी:- संकटग्रस्त महिलांना तातडिने एकाच ठिकाणी मदत मिळण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने “सखी वन स्टॉप सेंटर” ही योजना सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार सामान्य रुग्णालय परिसरातील धर्मशाळेच्या इमारतीमध्ये “सखी वन स्टॉप सेंटर” सुरु करण्यात आले आहे. कौटुंबिक हिंसाचार, पिडीत, लैगिक शोषणाच्या पिडीत , मानवी वाहतुकीस बळी पडलेल्या महिला, ॲसिड हल्ल्यातील पिडीत महिला, बालकास समुपदेशन सेवा कायदेशिर मदत, आवश्यक वैद्यकिय मदत व तात्पुरत्या स्वरुपात निवासाची व्यवस्था तसेच इतर …
Read More »आमदार दादाराव केचे यांनी श्री शेत्र टाकरखेडा येथे केला ‘घंटानाद’
वर्धा : आर्वी :- महाराष्ट्रातील मंदीर सुरू करण्यासाठी विविध धार्मिक संस्थांनी २९ अॉगष्टला राज्यभर ‘घंटानाद आंदोलन’ नियोजित केले असता भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्य यांनी आंदोलनाला पाठिंबा देऊन महाराष्ट्रभरातील कार्यकर्त्यांना सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन केले होते. आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी आर्वी तालुक्यातील श्री. क्षेत्र टाकरखेडा येथे कोरोनासाठीच्या सर्व नियमांचे पालन करीत आंदोलन केले. या प्रसंगी जिल्हा परिषद …
Read More »वर्धा रेल्वेस्थानकावरील मालधक्क्याचेवेळापत्रक सकाळी 6 ते रात्री पर्यंत सुधारीत करण्यास रेल्वे मंत्रालयाची मान्यता,खासदार रामदास तडस यांची माहिती
वर्धाःप्रतिनिधी::- वर्धा रेल्वेस्थानकावरील अस्तित्वात असलेल्या रेल्वे मालधक्क्याची वेळ यापूर्वी 24 तास अशी होती, यामुळे वर्धा परीसरातील वाहतुकदार, कामगार व मालधक्क्याशी निगडीत अनेकांना या वेळापत्रकामुळे त्रास सहन करावा लागत होता. कामगार आयुक्त कार्यालयाने देखील रात्री 10 नंतर कामगार उपलब्ध करुन देण्याकरिता असमर्थता दाखविल्याने वर्धा मालधक्क्यावर येणारे लोड अत्यंत कमी होऊन इतर मालधक्क्यावर वळते झाले होते. याचा परिणाम स्थानिक कामगारावर व अवलंबून …
Read More »वर्धेत संचारबंदी काळात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त, नियमाउल्लंघन करण्यावर कारवाई
वर्धा : प्रतिनिधी सचिन पोफळी:- दिवसें-दिवस कोरोना आजाराचे रुग्ण जिल्ह्यात वाढतच आहे. ही स्थिती पाहता उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी दोन दिवस संचारबंदीची घोषणा केली आहे. यामुळे २९ व ३० ऑगस्ट रोजी वर्धा, सेलू व देवळी तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात येणार आहे.नागरिकांनी कारण नसताना घराबाहेर पडू नये, सामाजिक अंतराचे पालन करावे, संचारबंदीचे दरम्यान बाहेर फिरणाऱ्यांवर कडक …
Read More »पोखरा प्रकल्पाची अंमलबजावणी समाधानकारक नसल्यास करवाई – कृषी मंत्री दादाजी भुसे
लाभार्थ्यांशी फोनद्वारे साधला थेट संवाद कृषी विषयक बाबींचा घेतला आढाव वर्धा दि 28:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- पोखरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये वर्धा जिल्हा अतिशय मागे आहे, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकल्पाची प्रगती पुढील एक महिन्यात समाधानकारक नसल्यास काम न करणाऱ्या अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिला. जिल्हा परिषद सभागृहात …
Read More »संपूर्ण नष्ट झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने ५० हजार रूपये एकरी आर्थिक मदत द्यावी – आमदार समीर कुणावार यांची कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या कडे मागणी
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या आज वर्धा जिल्हाच्या दौरावर आले असता जिल्हा परिषद सभागृहा समोरच आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकारी यांनी कृषीमंत्र्यांना सोयाबीनचे रोप दाखवत रोगांची दाहकता दाखवत एकरी ५० रूपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आधीच पेरलेले बियाणे न उगवल्यांने व दुब्बार पेरणीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लक्षवेधले त्याचप्रमाणे हिंगणघाट व समुद्रपुर तालुक्यासह एकुण …
Read More »वर्धा ब्रेकिंग :- वर्धा,देवळी,सेलू,हिंगणघाट 29, 30 ,ऑगस्ट रोजी संचारबंदी लागू
वर्धा:प्रतिनिधी:- वर्धा,सेलू आणि देवळी तहसीलमधील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे एसडीओ सुरेश बगळे यांनी शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी आदेश जारी केले आहे.या आदेशामध्ये दि.29 आणि 30 ऑगस्ट रोजी संचार बंदी जाहीर केली आहे.या आदेशानुसार संचारबंदीच्या काळामध्ये भाजीपाला , चिकन / मटन विक्री दुकाने , बेकरी कपडा मार्केट , किराणा हार्डवेअर / ऑटोमोबाईल सराफा बाजार , सलून , इलेक्ट्रीकल व ईलेक्ट्रॉनिक्स …
Read More »गणेशोत्सवातील देखावे दिसेनासे झाल्याची खंत — नगराध्यक्ष प्रा प्रशांत सव्वालाखे
वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- आर्वी – गणेशोत्सवाकरिता प्रशासनाने लागू केलेल्या जाचक अटी, आर्थिक मंदी, सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली उदासीनता यामुळे आर्वी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्साह दिवसेंदिवस मावळू लागला आहे. काही वर्षाआधी सार्वजनिक गणेश मंडळाप्रमाणे प्रा प्रशांत सव्वालाखे यांच्या घरचा गणपती प्रसिद्ध होता विज्ञानावर आधारित प्रयोगाद्वारे अंधश्रद्धा, हुंडा, शिक्षण, बालविवाह, पर्यावरण, प्रदूषण आदी विषयावर सामाजिक देखावे निर्माण करून जनजागृती केली जात होती …
Read More »वर्धा जिल्ह्यात आज 65 कोरोनाबाधित रुग्णांंची नोंद,तर एकाचा मृत्यू तर कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे 594 व्यक्तींना देण्यात आली सुट्टी
वर्धा प्रतिनिधी :- आज गुरुवार 27 ऑगस्ट रोजी प्राप्त कोरोना चाचणी अहवाल 147 आले असून आज 65 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहे.तसेच आज कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज रुग्णालयातून 594 व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे.तसेच आज आयसोलेशन मध्ये एकूण 541 व्यक्ती आहे.तसेच आज 747 स्त्राव नमुने चाचणी करिता पाठवण्यात आले असल्याची माहिती आहे.आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी 15096 स्त्राव नमुने पाठवण्यात आले असून त्यापैकी …
Read More »