Breaking News

जमिनीच्या वादातून महिला नायब तहसीलदारास मारहाण

बीड जिल्ह्यातील केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्यावर अज्ञात व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

प्राप्त माहितीनुसार, शुक्रवार, दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास केज तहसीलच्या संजय गांधी विभागाच्या नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड त्यांच्या घरी दुपारचे जेवण करून तहसील कार्यालयाकडे येत होत्‍या. यावेळी त्यांना एका कारमधून त्यांच्या भावाची बायको सुरेखा मधुकर वाघ व सुरेखा यांचा भाऊ हरिदार भास्कर महाले व तिची आई मुंजाबाई भास्कर महाले, एक महिला आणि वाहन चालक यांनी रस्त्यात अडवले. यानंतर जळगाव जिल्ह्यातील दोनडिगर येथील जमिनीच्या हक्क सोड पत्रावर सही करण्यासाठी दमदाटी केली. तसेच तुझ्यामुळे मधुकर वाघ हा जेलमध्ये असल्याने त्याची सुटका करण्यासाठी पोलीस प्रकरण मागे घेण्यासाठी वाद घातला.

यांनतर त्या महिलांनी त्यांच्या गळ्यात दोरीचा फास टाकून गळा आवळला आणि हरिदास मुंजाबा महाले याने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला. यानंतर आशा वाघ- गायकवाड यांनी आरडा-ओरड करत समोरील हॉटेल मधूबनकडे पळाल्‍या. लोक जमा होताच हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. आशा वाघ-गायकवाड यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

About विश्व भारत

Check Also

कलेक्टर निवास परिसर में अवैध शराब धंधा जोरों पर

कलेक्टर निवास परिसर में अवैध शराब धंधा जोरों पर   टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

नाव हादसे मे 3 लोगों की डूबकर मौत : 11लोग बाल बाल बचे

नाव हादसे मे 3 लोगों की डूबकर मौत : 11लोग बाल बाल बचे टेकचंद्र शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *