Breaking News

महसूल सचिवांसह 10 आयएएसच्या बदल्या : तहसीलदार, उपजिल्हाधिकारी चिंतेत

Advertisements

राज्य सरकारने आज दहा सनदी अधिकाऱ्यांची बदली केली आहे. आज झालेल्या बदल्या या महत्त्वाच्या बदल्या आहेत. जी श्रीकांत हे छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहे. तर, पी शिवशंकर हे शिर्डी संस्थानचे नवे सीईओ असतील. राज्यात आपल्या कार्यशैलीने सर्वाधिक चर्चेत असलेले तुकाराम मुंडे यांना अखेर नवीन जबाबदारी मिळाली आहे. कृषी आणि पशूसंवर्धन खात्याते अतिरिक्त सचिव म्हणून तुकाराम मुंडे यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांच्या बदलीमुळे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्या बदल्या लांबणीवर पडतील की तातडीने होणार? असा प्रश्न आहे.

Advertisements

1. 1998 च्या बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. नितीन करीर हे सध्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून महसूल, नोंदणी आणि मुद्रांक, महसूल आणि वन विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Advertisements

2. 1992 च्या बॅचचे अधिकारी मिलिंद म्हैसकर यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

3. 1994 च्या बॅचचे अधिकारी डी.टी.वाघमारे यांची गृहविभागाच्या PS (A&S) म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

4. 1995 च्या अधिकारी श्रीमती राधिका रस्तोगी) यांची अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची महापारेषण विभाागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

6. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

7. तुकाराम मुंढे, कृषी आणि पशूसंवर्धन खात्याते अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

8. 2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी जी. श्रीकांत हे आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त असणार आहेत. त्यांच्याकडे सध्या राज्य कर विभागाचे छत्रपती संभाजीनगरचे सह-आयुक्त म्हणून जबाबदारी आहे.

9. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त असलेले डॉ. अभिजित चौधरी यांची राज्य कर विभागात छत्रपती संभाजीनगरचे सह-आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

10. पी. शिव शंकर यांची श्री साईबाबा संस्थान ट्र्स्ट, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे नागपूर टेक्सटाईल विभागाचे संचालक म्हणून जबाबदारी आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

चित्रपटाची ऑफर नाकारुन झाल्या उपजिल्हाधिकारी

ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील अधिकारी आहेत. त्यांना डॉक्टर व्हायचे होते. त्यांनी राजकारणाच्या क्षेत्रातही प्रवेश केला. …

मतदान में लापरवाही : अधिकारी सहित 3 निलंबित

मतदान में लापरवाही : पीठासीन अधिकारी सहित 3 निलंबित टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट लोकसभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *