Breaking News

नागपुरात सेतू कार्यालयाकडून सामान्यांची लूट : ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मागितले ५०० रुपये

Advertisements

नवीन रेशनकार्ड ऑनलाइन नोंदणीकरिता खासगी संगणक केंद्रावर चक्क पाचशे रुपये वसूल करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार सध्या हिंगणा परिसरात सुरू आहे. यातून लाभार्थ्यांची मोठी आर्थिक लूट होत आहे.

Advertisements

रेशन कॉर्डचा अर्ज भरून देण्यासाठी रेशनिंग विभाग ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी सांगतो. त्यानंतर नोंदणीकृत सेतू केंद्रावर गेल्यावर अर्ज नोंदणी विषयी प्रशिक्षण किंवा परवानगी नाही, असे सांगून तिथे त्यांना खासगी संगणक केंद्रावर जाण्याचा सल्ला दिला जातो. काही खासगी केंद्राचे नाव दिले जाते.

Advertisements

तिथे गेल्यावर मात्र ही ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी चक्क पाचशे रुपये मागितले जातात. त्यामुळे ही तहसील कार्यालय सेतू ते खासगी संगणक केंद्र साखळी निर्माण करून नागरिकांची आर्थिक लूट तर केली जात नाही? हा प्रश्न निर्माण उपस्थित होत आहे. तालुक्यातील नोंदणीकृत सेतू असो किंवा खासगी संगणक केंद्र कुठेही कागदपत्रे तयार करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या पैशाची यादी नाही. शिवाय या सर्व केंद्राचे परस्पर लागेबांधे असून सर्व ठिकाणी मनमानी दराने पैसे वसूल करण्यात येत असल्याची ओरड नागरिकांची आहे. मात्र यावर कुणाचेही नियंत्रण नाही हे खरे आहे.

परवानगी नोंदणीकृत सेतुला नाही

नवीन रेशनकॉर्डकरिता अर्ज करण्यासाठी एक सोपे ॲप पुरवठा विभागाने तयार केली असून अँड्रॉइड मोबाईलवरून सुद्धा अर्ज करता येऊ शकतो,असे विभागाचे म्हणणे आहे. परंतु अजूनही ग्रामीण भागात सर्वांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत. त्यामुळे त्यांना अर्ज भरण्यासाठी संगणक केंद्रावर जावे लागते.याचाच फायदा घेऊन गोरगरिबांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेण्यात येत आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

जिल्हाधिकारी डॉ. इटनकर कुणावर करणार कारवाई : नागपुरात मतदान कमी होण्यासाठी जबाबदार कोण?

लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत नावे नसल्याने नागपुरातील लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिल्याबद्दल सार्वत्रिक ओरड होत …

हे काय सुरु आहे?नागपुरातील मतदानात तफावत

नागपूर लोकसभेसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर शनिवारी अधिकृत आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध करण्यात आली. तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *