माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल पण तुम्हाला योजनेअंतर्गत 3000 रुपये मिळाले नसतील तर काही गोष्टी झटपट करणं हे महत्त्वाचं आहे. कारण त्यानंतरच तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणे सुरू होईल.
माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत राज्यातील महिलांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून दरमहा 1500 रुपयांच्या आर्थिक मदतीची तरतूद ही शिंदे सरकारकडून राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आली होती. 28 जून 2024 पासून ही योजना राज्यात लागू करण्यात आली.
या योजनेच्या अंमलबजावणीनंतर महिलांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, त्याअंतर्गत महिला नारीशक्ती दूत ॲप आणि योजनेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात, याशिवाय राज्य सरकारद्वारे ऑफलाइन माध्यमातून अर्ज महिलांना अर्ज करता येणार आहे. ज्यासाठी फॉर्मही जारी केले आहेत.योजनेसाठी अर्ज केल्यानंतर महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले असून, या योजनेंतर्गत 14 ऑगस्ट 2024 पासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपयांचा पहिला हप्ता वर्ग करण्यात आला आहे, मात्र तरीही राज्यात अनेक या योजनेसाठी महिलांचे अर्ज स्वीकारले जात असताना त्यांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळालेला नाही.
लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाला नसेल तर सगळ्यात आधी तुम्हाला लाडकी बहीण योजना आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे.