Breaking News
Oplus_131072

सोशल मीडियावर ‘पोस्ट फॉरवर्ड’ करणाराही गुन्हेगार : देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

चुकीची पोस्ट किंवा चुकीची चित्रफित तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित करणे आणि ती पोस्ट किंवा चित्रफित फॉरवर्ड करणे गुन्हेगारी कृत्य आहे. त्यांच्याविरुद्ध सायबर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर पत्रकार क्लब यांच्यातर्फे बुधवारी मुख्यमंत्र्यांशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते एका प्रश्नावर बोलत होते.

पोस्ट फॉरवर्ड करणारे गुन्हेगार

सायबर गुन्हे हे मोठे आव्हान आहे. तंत्रज्ञानाचा जर चांगला उपयोग आहे. तसेच काही नालायक, दृष्ट लोक त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करीत आहेत. या माध्यमातून ते लोकांना लुबाडण्याचे काम करीत आहेत. समाजात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जाती-जातींमध्ये विद्वेष निर्माण करीत आहेत. राज्यात सायबर जागरूकता अभियान सुरू केले जाणार आहे. आपण ‘सायबर सिक्युरिटी प्लॅटफार्म’ तयार केला आहे, असेही ते म्हणाले. मी सभागृहात नक्षलवाद्यांविषयी बोललो. पण, ते वगळून केवळ संविधानाला मानत नाही. एवढी चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित केली जात आहे. पण, मी सांगू इच्छितो, अशाप्रकारची चित्रफित कोणी केली आणि ती कुणी-कुणी फॉरवर्ड केली, हे लगेच शोधून काढणे शक्य आहे. मोडतोड करून चित्रफित तयार करणारा गुन्हेगार तर आहेच. पण, ते फॉरवर्ड करणार सहआरोपी होतो, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

भाजपचे आमदार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यंनी मला पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची संधी आहे. त्या संधीचे सोने करण्याचा माझा प्रयत्न राहील. एक नागपूरकर म्हणून नागपूरकरांची मान नेहमी उंच राहिले, अशा पद्धतीने काम करेन. प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे सरकार चालावे, असे माझा कायम आग्रह राहिला आहे. त्यानुसार राज्याचा कारभार चालवण्यात येईल, असेही ते म्हणाले. राजकारणात कुठल्याही पातळीवर जाऊन आव्हान निर्माण केली जातात. पण, धैर्यपूर्वक त्या आव्हानाला सामोरे गेलो. मी सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाऊ दिली नाही. सत्ता हे सेवेचे माध्यम आहे, असे मी मानतो, असेही म्हणाले.

राज्यभरात सहा नदीजोड प्रकल्पांची कामे हाती घेतली आहेत. यामुळे विदर्भातील १० लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे विदर्भाचा कायापालट होणार आहे. हे प्रकल्प अनेक पिढ्यांवर परिणाम करणारे आहेत. गडचिरोली जिल्हा स्टील सिटी म्हणून उदयास येत आहे. या भागातील नक्षलवाद कमी झाला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

About विश्व भारत

Check Also

रेती ढुलाई पर प्रतिबंध से जरुरतमंद निर्माता फर्मों और मजदूरों पर संकट

रेती ढुलाई पर प्रतिबंध से जरुरतमंद निर्माता फर्मों और मजदूरों पर संकट टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक …

बंजारा विरुद्ध ST, दूसरी तरफ मराठा बनाम ओबीसी : CM फडणवीस चिंता में

बंजारा विरुद्ध ST, दूसरी तरफ मराठा बनाम ओबीसी : CM फडणवीस चिंता में टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *