Breaking News

इरई नदीवरील स्टेड- ब्रिजला ‘रामसेतू’ नामकरणाचा ठराव

Advertisements

इरई नदीवरील स्टेड- ब्रिजला ‘रामसेतू’ नामकरणाचा ठराव

चंद्रपूर, ता. २३ : इरई नदीवर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, हा पूल आता लोकसेवेत रुजू झाला आहे. अध्यक्ष, लोकलेखा समिती, महाराष्ट्र विधीमंडळ तथा माजी कॅबीनेट मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नातून दाताळा रोडवरील इरई नदीवर उभारण्यात आलेल्या भव्य स्टेड-ब्रिजला ‘रामसेतू’ हे नाव देण्याचा ठराव २३ जून रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिककेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील राणी हिराई सभागृहात २३ जून रोजी सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, आयुक्त राजेश मोहिते, सभागृह नेता संदीप आवारी, भाजपचे गटनेता वसंत देशमुख, विरोधी पक्षनेता डॉ. सुरेश महाकुलकर, बसपचे गटनेता अनिल रामटेके, शिवसेनेचे गटनेता सुरेश पचारे आदींसह आभासी माध्यमातून झोन सभापती, सर्व नगरसेवक उपस्थित होते.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल पावडे यांनी सभागृहात अध्यक्ष, लोकलेखा समिती, महाराष्ट्र विधीमंडळ तथा माजी कॅबीनेट मंत्री (म.रा) आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नातून दाताळा रोड मार्गातील इरई नदीवर उभारण्यात आलेल्या भव्य स्टेड – ब्रिजला ‘रामसेतू’ हे नाव देण्याची मागणी केली. मुंबईच्या धर्तीवर अतिशय भव्य असा स्टे -ब्रिज साकारण्यात आलेला आहे. ब्रीजमुळे चंद्रपूर शहराचे नावलौकिक झाले. स्टेड – ब्रिजच्या आकर्षणामुळे अतिशय कमी कालावधीत स्टेड-ब्रिज संपुर्ण शहरवासीयांसाठी एक पर्यटन स्थळ ठरले आहे. त्याचप्रमाणे इरई नदी दाताळा रोड लगत असलेल्या परिसर हा जगन्नाथबाबा यांची पावन नगरी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे संपुर्ण शहरवासी इरई नदी दाताळा रोड या मार्गात उभारण्यात आलेल्या भव्य स्टेड – ब्रिज बघण्यासाठी येत असतात. या स्टेड – ब्रिजला ‘रामसेतू’ असे नाव देण्याचा प्रस्ताव सभागृहात ठेवण्यात आला. त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली आहे.  

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

राजस्थान में बीजेपी ने वसुंधरा को मुख्यमंत्री नहीं बनाया तो इन नामों पर हो सकता है विचार

राजस्थान में बीजेपी ने वसुंधरा को मुख्यमंत्री नहीं बनाया तो इन नामों पर हो सकता …

पनवती कोण? काँग्रेसला आता कळले असेल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जे अभूतपूर्व यश मिळाले ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *