Breaking News

छ.राजश्री शाहू महाराज जयंती साजरी.

Advertisements
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्थेचे आयोजन 
* छ.राजश्री शाहू महाराज जयंती साजरी.
राजुरा, वार्ताहर  –
             छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त बामनवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज बालोद्यान, तक्षशिला नगर येथे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेमार्फत वृक्षारोपण, मोफत पाठ्यपुस्तक वाटप व सभासद नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कोविड महामारीच्या काळात गरीब व गरजू लोकांना जेवण, फराळ व  किराणा किटचे वाटप करून जनतेची निरपेक्ष सेवा केल्याबद्दल ‘ हेल्पिंग हँड ‘ च्या प्रमुख कृतीका सोनटक्के व ‘ आधार तरुणांचा ‘ या संस्थेच्या प्रमुख स्वाती मेश्राम यांना गौरविण्यात आले.
               या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे जिल्हाध्यक्ष विजय जांभूळकर यांनी भूषविले. प्रमुख अतिथि म्हणून वनपाल विलास कुंदोजवार, माजी सरपंच सर्वानंद वाघमारे, जेष्ठ शिक्षिका रजनी शर्मा, कवी डॉ.किशोर कवठे, संतोष देरकर, विठ्ठल बक्षी, मेघराज उपरे, किशोर कवठे, ईश्वर देवगडे, जेष्ठ नागरिक पाल, भास्कर करमरकर उपस्थित होते. यावेळी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांनी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जीवन चरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या तालुका उपाध्यक्षा रजनी शर्मा यांच्यातर्फे शिवाजी हायस्कूल, चुनाळा येथील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाची पुस्तके मोफत देण्यात आली. यावेळी बालोद्यान परिसरात वृक्षारोपन आणि संस्थेची नवीन सभासद नोंदणी करण्यात आली.
                कार्यक्रमाचे प्रास्ताविक बादल बेले, संचालन पूर्वा देशमुख व आभार सुनयना तांबेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राजश्री उपगन्लावार,वर्षा कोयचाडे,वर्षा वैद्य,प्रतिभा भावे,माणिक उपलंचीवार , ललिता खंडाळे,कृतीका सोनटक्के,संदीप आदे,आशीष करमरकर,नागेश उरकूडे, दिवाकर गौरकार,नितीन जयपूरकर,प्रदीप भावे,उमेश लढी,सूर्यभान गेडाम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने झाला.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

प्रभू श्रीराम पर अभद्र टिप्पणी के खिलाफ रामभक्तों का आंदोलन

  नागपूर,कोराडी। गत 16 अप्रैल की रात किसी अज्ञात तत्वों द्धारा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम के …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *