वर्धा जिल्हा प्रतिनिधी :सचिन पोफळी-
वारंवार राज्य शासनाचे, चुकीच्या दिशेने आखले जात धोरण व त्यामुळे सर्वसामान्य जनतेला होत असलेला नाहक त्रास, याच्या निषेधार्थ आज वर्धेतील शिवाजी चौक येथे भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी हाताला काळ्या फीत बांधून *जन आक्रोश आंदोलन करण्यात केले*
राज्य शासनाच्या दुटप्पी निर्णयाने महाराष्ट्रातील संपूर्ण जनता दुखावलेली आहे. कारण या सरकारने शेतकरी असो वा सर्वसामान्य जनता, सर्वांनाच कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्रस्ट करून सोडलेले आहे असे विधान वर्धा विधान सभेचे आमदार डॉ रामदास आंबटकर यांनी केले. तसेच केंद्र सरकार ची भक्कम मदत तसेच अर्थ साहाय्य मिळत असून सुद्धा जनतेला त्याचा लाभ घेण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहे याला सर्वस्वी जवाबदार चुकीचे व्यवस्थापन व शासनाची निस्तेज इच्छाशक्ती सर्वस्वी जवाबदार आहे असे वर्धा लोकसभा खासदार श्री रामदास तडस म्हणाले. त्याचप्रमाणे घरकुळाच्या ड गटातील यादीच घोळ असो की महा वितरणाचे मानमांनी पद्धतीने वीज कनेक्शन कापणे असो सुशासन राबविण्याच्या दिशेने आघाडी सरकर सबशेल फोल ठरली आहे. असे वर्धेचे आमदार पंकज भोयर म्हणाले.
या आंदोलनाला वर्धा लोकसभेचे खासदार श्री रामदास जी तडस, विधानपरिषद आमदार डॉ रामदास आंबटकर,वर्धेचे आमदार श्री पंकज भोयर, भाजप प्रदेशचे श्री राजेश जी बकाणे, नगराध्यक्ष श्री अतुल जी तराळे, श्री अविनाश जी देव, श्री विरु जी पांडे, व भाजप चे सर्व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य तसेच सर्व नगर परिषद सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
Check Also
नागपुरात वाढतेय थंडी : राजकीय पारा चढला
राज्यातील विदर्भ वगळता इतर भागात आजदेखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अधिकांश भागात …
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या!
‘उद्धव ठाकरे यांच्याआधी माझी बॅग तपासल्या गेली. सर्वांच्याच बॅग तपासल्या जात आहेत. मात्र, काही लोकांना …