Breaking News

‘पीडब्लूडी’च्या दुर्लक्षतेमुळे २३३ प्राथमिक आरोग्य केंद्रे मोडकळीस : आरोग्य विभाग हतबल

Advertisements

राज्यातील ग्रामीण आरोग्याची मदार असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था अत्यंत वाईट असून जवळपास २३३ प्राथमिक आरोग्य केंद्र एक तर मोडकळीला आली आहेत वा धोकादायक म्हणून जाहीर झालेली असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

Advertisements

या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी वा नव्याने बांधण्यासाठी आरोग्य विभागाने प्रस्ताव तयार केले असले तरी निधी नसल्याने खोळबले आहे.

Advertisements

राज्यातील आरोग्य विभागाच्या १८३९ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी तब्बल २३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती मोडकळीला आल्याचे वा धोकादायक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय बहुतेक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने रुग्णांवर उपचार करणे कठीण होत असल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्र ही ग्रामीण आरोग्याचा पाया असून गावखेड्यातील रुग्णांसाठी ही आरोग्य केंद्रे मोठा आसरा असतात.

ठाणे जिल्ह्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे मोडकळीला आली आहेत अथवा धोकादायक स्थितीत आहेत. या सर्व केंद्रांमध्ये गळती होत असते. पालघरमध्ये सात, अमरावती येथे १२, रायगड येथे १३, पुणे येथील १० तर नागपूर येथील २६ प्राथमिक आरोग्य केंद्र मोडकळीस आले आहेत. बीड जिल्ह्यातील १३ प्राथमिक आरोग्य केंद्रांची परिस्थिती फारच दयनीय असून आरोग्य केंद्रांच्या बहुतेक इमारती या धोकादायक असल्याचे अहवालात म्हटले आहे. गोंदिया जिल्ह्यातील २९ आरोग्य केंद्रांची पाहणीच झालेली नसल्याचे आढळून आले आहे.

ही गंभीर बाब…

आरोग्य विभागाला नवीन बांधकाम अथवा दुरुस्ती आदी काहीही करायाचे झाले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या(पीडब्लूडी)माध्यमातून ही कामे करावी लागतात. यात प्रचंड दिरंगाई होत असल्यामुळे आरोग्य विभागाअंतर्गत स्वतंत्र बांधकाम कक्ष निर्माण करण्याचा प्रस्तावही आरोग्य विभागाने तयार केला असून याला सरकारची मान्यता मिळाल्यास रुग्णालयीन बांधकामे व दुरुस्तीच्या कामांना गती देता येईल अन्यथा मोडकळीला आलेल्या वा धोकादायक आणि गळक्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येच बसून आमच्या डॉक्टरांना गोरगरीब रुग्णांवर उपचार करावे लागतील, असेही अस्वस्थपणे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

पुणे और नासिक से कौन होगा उम्मीदवार? महायुति में सुलझा सीट शेयरिंग का झगड़ा!

पुणे और नासिक से कौन होगा उम्मीदवार? महायुति में सुलझा सीट शेयरिंग का झगड़ा! टेकचंद्र …

उच्चतम विटामिन की खान है आयुर्वेदिक अश्वगंधा? तनाव थकान ब्रेन पावर के लिए है संजीवनी

उच्चतम विटामिन की खान है आयुर्वेदिक अश्वगंधा? तनाव थकान ब्रेन पावर के लिए है संजीवनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *