Breaking News

अंघोळ गरम पाण्याने करावी की थंड? तज्ञांचे मत काय?

Advertisements

अंघोळ केल्याने आपल्या शरीरावरील मळ,घाम दूर होऊन शरीर स्वच्छ होते. जवळपास प्रत्येक जण दिवसातून एकदा तरी आंघोळ करत असला तरी आंघोळीसाठी वापरण्यात येणारे पाणी गरम की थंड असावं हा प्रत्येकाचा चॉईस असतो. गरम पाण्याने आंघोळ केल्यावर काहींच्या शरीराला ऊर्जा मिळते. तर काहींना थंड पाण्याने आंघोळ केल्यावर फ्रेश वाटतं. तेव्हा दररोज गरम पाण्याने आंघोळ करावी की थंड पाण्याने? हे तज्ञांकडून जाणून घेऊया…!

Advertisements

डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, थंड किंवा गरम पाण्याने आंघोळ करणं हे प्रत्येकाच्या आवडीवर आणि सवयीनुसार आहे. मात्र अगदी कडक आणि अगदी थंड पाण्याने आंघोळ करू नये. फ्लूसारखी लक्षणं असल्यास गरम पाण्याने आंघोळ करावी, जेणेकरून तुमच्यामधील ही लक्षणं कमी होतील. अशावेळी थंड पाण्याने आंघोळ करू नये नाहीतर लक्षणं अधिक तीव्र होण्याची शक्यता असते. तर गरम पाण्यामुळे त्वचा कोरडी होते. त्यामुळे एक्झेमासारख्या त्वचेच्या समस्या असल्यास गरम पाण्याने अंघोळ करणं टाळावं. गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर त्वचेला मॉईश्चरायझर लावावं जेणेकरून त्वचा मुलायम राहील.

Advertisements

गरम पाण्याचे फायदे

1. अंगदुखी कमी करण्यासाठी : गरम पाण्याने आंघोळ केल्यास स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदना आणि अंगदुखी कमी होण्यास मदत होते. तेव्हा वर्कआऊटनंतर काही वेळाने किंवा दिवसभर शारीरीक कष्टाचं काम केल्यावर गरम पाण्याने आंघोळ केल्यास तुम्हाला आराम मिळू शकतो. तसेच पाय दुखत असल्यावर तुम्ही गरम पाण्यात पाय बुडवून बसल्यास काहीसाआराम मिळू शकेल.

2. त्वचा उजळते- गरम पाण्याने अंघोळ केल्यावर तुमच्या त्वचेवरील छिद्र खुली होतात. ज्यामुळे त्वचेतील घाण बाहेर निघण्यास मदत होते आणि त्वचा पूर्णपणे स्वच्छ होते. गरम पाण्याने आंघोळ केल्यास आपल्या त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते आणि ती स्वच्छ राहिल्यामुळे उजळते.

3. उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो- गरम पाण्याने आंघोळ करणं हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरत. जनरल हार्टमध्ये प्रकाशित झालेल्या एका शोध अभ्यासानुसार रोज गरम पाण्याने अंघोळ करणं कार्डियोवॅस्कुलर हेल्दसाठी चांगलं असतं. तसचं गरम पाण्याने आंघोळ केल्याने उच्च रक्त दाबाची समस्या कमी होते.

4. डोकेदुखी कमी होते- गरम पाण्याने आंघोळ केल्यास डोकेदुखीची समस्या दूर होते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशनच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार गरम पाण्याने आंघोळ केल्यास तणावामुळे होणाऱ्या डोकेदुखी पासून आराम मिळू शकतो.
5. चांगली झोप – रात्री गरम पाण्याने आंघोळ केल्यास चांगली झोप लागण्यास मदत होते. दिवसभर काम केल्याने शरीर थकलेलं असतं. अशावेळी झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ केल्यास बॉडी रिलॅक्स होते आणि चांगली झोप लागते.

थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे :

1. रक्त प्रवाह चांगला राहतो – थंड पाण्याने आंघोळ केल्यास संपूर्ण शरीरातील रक्त प्रवाह वाढतो. त्यामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन चांगल होण्यास मदत होते.

2. केस चमकतात त्वचा सॉफ्ट होते- थंड पाण्यामुळे तुमच्या त्वचेवरील छिद्र घट्ट होतात. तसचं थंड पाण्याने केस धुतल्यास त्यातील नैसर्गिक तेल टिकून राहण्यास मदत होते आणि केस चमकदार दिसतात. तसचं थंड पाण्याने आंघोळ करणं त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करतं.

3. वजन कमी करणे- थंड पाण्याने वजन कमी होण्यास मदत होते. थंड पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या कॅलरीज जलद गतीने बर्न होतात आणि यामुळे तुमची उर्जेची पातळी वाढते ज्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी होतो.

4. डिटॉक्सिफिकेशन- थंड पाणी शरीराला डिटॉक्सिपाई करण्यास मदत करते. सकाळी लवकर उठून थंड पाण्याने आंघोळ केल्यास तुमच्या शरीरातील घाण तसचं अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते.

5. तणाव कमी करणं- थंड पाण्याने ताणतणाव कमी करण्यास मदत करते. तसचं थंड पाण्याने अंघोळ केल्यामुळे तुमचा मूड चांगला होतो आणि आळस आणि थकवा दूर होते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

5 जिल्हाधिकऱ्यांची ‘ईडी’कडून चौकशी

पाच जिल्हाधिकाऱ्यांची सक्तवसुली संचालनालयापुढे (ईडी) चौकशी झाली. अवैध वाळू उपसा प्रकरणात चौकशी झाली आहे. यात …

नरेंद्र मोदी विचारमंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशीभूषण देसाई यांचा हजारो कार्यकर्त्यांसह हिंदु महासभा पक्षात प्रवेश

नरेंद्र मोदी विचारमंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशीभूषण देसाई यांचा हजारो कार्यकर्त्यांसह हिंदु महासभा पक्षात प्रवेश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *