Breaking News

राज्यातून सोमवारपासून मान्सून परतीच्या प्रवासावर

Advertisements

देशासह राज्यात यावर्षी अतिशय कमी प्रमाणात बरसलेला मान्सून आता परतीच्या प्रवासाला निघाला आहे. 25 सप्टेंबर म्हणजेच येत्या सोमवारपासून पश्चिम राजस्थानपासून मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. त्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी वर्तविला. राज्यात बहुतांश जिल्ह्यांत सोमवारपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Advertisements

नागपूरमध्ये पाणीच-पाणी👇👇👇

Advertisements

नागपुरातील गांधीनगर, कॉर्पोरेशन कॉलनी, डागा ले-आउट, शंकरनगर चौक, सुभाषनगर, दिघोरी, नरसाळा भागात पाणी-पाणी

👉जीव वाचविण्यासाठी नागरिकांची धावपळ

👉काही घरात निघाले साप, जलचर प्राणी

👉अंबाझरी धरण ओव्हरफ्लो असून फुटण्याची भीती

यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिशय कमी प्रमाणात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली. राज्यात केवळ जुलै महिन्यात दहा ते बारा दिवस जोरदार पाऊस झाला. त्याही आधी जून महिना जवळजवळ कोरडाच गेला; तर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा निम्मा महिना तुरळक ठिकाणीच किरकोळ भागात पावसाने हजेरी लावली. मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प होते. देशाच्या ईशान्य आणि मध्य भारतात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाने हजेरी लावून दाणादाण उडवून दिली. असे असले तरी यावर्षी पावसाने शेतकर्‍यांसह नागरिकांना अनेक धक्के दिले आहेत.

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्यासाठी राजस्थानच्या पश्चिम भागात मोकळे आकाश तसेच अँटी चक्रीय स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्यास अनुकूल असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे 25 सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुर आगमन पर RSS प्रमुख मोहन भागवत की शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती के साथ विशेष चर्चा

नागपुर आगमन पर RSS प्रमुख मोहन भागवत की शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती के साथ विशेष …

दिल्ली में आज नहीं हो पाएंगे मेयर चुनाव? AAP ने कहा- पुरानी परंपरा तोड़ना चाहते हैं उपराज्यपाल

दिल्ली में आज नहीं हो पाएंगे मेयर चुनाव? AAP ने कहा- पुरानी परंपरा तोड़ना चाहते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *