सिलिंडरचा मोठा स्फोट, फुगेवाल्याचा जागीच मृत्यू : ८ मुले गंभीर जखमी

सिलिंडरच्या स्फोटात फुगे विकणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. चार ते आठ वर्षातील सात ते आठ बालके गंभीर जखमी झाले. लातूर शहरातील तावरजा कॉलनी भागात रविवारी सायंकाळी ही घटना घडली.

मृत फुगेवाला हा एका दुचाकीवर गॅस सिलिंडर घेऊन आलेला होता. त्याच्याजवळ फुगे घेण्यासाठी म्हणून सात ते आठ मुले आलेली होती.

यादरम्यान, अचानक सिलिंडरचा स्फोट होऊन प्रचंड मोठा आवाज झाला. या स्फोटात फुगे विकणारा व्यक्ती जागीच ठार झाला आहे. याची माहिती मिळताच विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुधाकर वावकर आणि त्यांचे दोन पथके घटनास्थळी दाखल झाली. तात्काळ रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले आणि त्यामधून जखमी लहान मुलांना लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

About विश्व भारत

Check Also

नागपुरात वाढतेय थंडी : राजकीय पारा चढला

राज्यातील विदर्भ वगळता इतर भागात आजदेखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अधिकांश भागात …

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या!

‘उद्धव ठाकरे यांच्याआधी माझी बॅग तपासल्या गेली. सर्वांच्याच बॅग तपासल्या जात आहेत. मात्र, काही लोकांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *