Breaking News

“स्वातंत्र्यवीर सावरकरांची निंदा नको…” : राहुल गांधींवर नागपुरात टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभ्रमण केले, याचे कौतुकच आहे. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर पुराव्यांअभावी टीका करणे, त्यांची निंदा करणे अगदी चुकीचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक वि.स. जोग यांनी व्यक्त केले. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

अभद्र भाषेच्या वापरासाठी सत्तापक्ष आणि विरोधी पक्ष दोन्ही समान जबाबदार आहेत. राजकारण्यांची डोकी ठिकाणावर आहेत का? असा सवाल साहित्यिकांनी राजकारण्यांना विचारावा, असा सल्ला जोग यांनी दिला. जोग यांच्या व्यक्तव्यावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनीही लगेच उत्तर दिले. जोग यांचे विचार मार्क्सवादी आहेत तरी त्यांचे सावरकरांवर प्रेम का आहे? याचे कोडे कुणालाही उलगडले नाही. राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेले विधान अऐतिहासिक नाही असे नव्हे तर ते लोकप्रिय नसल्याने आपल्याला मान्य नाही आहेत. विज्ञानाचे पुरस्कर्ते सावरकर हिंदुत्ववाद्यांना मान्य का नाही, असा खोचक सवालही जोशी यांनी कार्यक्रमात विचारला.

About विश्व भारत

Check Also

विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला : नागपुरात पावसाचा जोर

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. विशेषत: मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडतोय. अनेक जिल्ह्यांमध्ये …

BJP आमदार परिणय फुके यांच्यासह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल

भाजपचे विधानपरिषद आमदार परिणय फुके यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *