Breaking News

फडणवीसांच्या विरोधात अनिल देशमुख निवडणूक लढविणार

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. असे झाल्यास या मतदारसंघात विद्यामान गृहमंत्री विरुद्ध माजी गृहमंत्री अशी लढत होण्याची शक्यता आहे.

 

निवडणुकांची घोषणा झाली नसली तरी महायुती व महाविकास आघाडीने निवडणुकीच्या तयारीस सुरुवात केली आहे. नागपूरमध्ये दक्षिण-पश्चिम या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाचाही समावेश आहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. येथून फडणवीस सलग तीन वेळा विजयी झाले. परंतु, यावेळी त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याचे कळते. अनिल देशमुख हे काटोल या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून पाच वेळा निवडून आले. यंदाही ते तेथूनच लढणार, असा अंदाज बांधला जात होता. मात्र आता त्यांच्या नावाची चर्चा दक्षिण-पश्चिम नागपूरसाठी होऊ लागली आहे. ही जागा आघाडीत काँग्रेसकडे आहे. मात्र, येथून काँग्रेसला मतदारसंघाच्या निर्मितीपासून म्हणजे २००९ पासून एकदाही विजय मिळवता आला नाही. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात अनिल देशमुख गृहमंत्री होते व त्यांच्यावर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीरसिंह यांनी गैरव्यवहाराचे आरोप केले होते.अनिल देशमुख यांच्या उमेदवारीबद्दल मला अद्याप काहीच माहिती नाही, या केवळ अफवा आहेत, असे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी (शरद पवार गट) दुनेश्वर पेठे यांनी म्हटले आहे.

 

नागपूर शहरातील विधानसभेच्या सर्व सहाही जागा काँग्रेसच लढणार आहे. मित्रपक्षासाठी जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही.- अतुल लोंढे, प्रवक्ते, काँग्रेस.

 

दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. फडणवीस यांनी येथे अनेक विकासकामे केली आहेत. त्यांचा लोकांशी थेट संपर्क आहे. त्यांच्या विरोधात अनिल देशमुखच काय, शरद पवार जरी लढले तरी विजय फडणवीस यांचाच होणार. – चंदन गोस्वामी, प्रवक्ते, भाजप.

About विश्व भारत

Check Also

कांग्रेस के पूर्व केंद्रीय मंत्री व पूर्व CM कमल नाथ का राजनैतिक गढ ध्वस्त!

कांग्रेस के पूर्व केंद्रीय मंत्री व पूर्व CM कमल नाथ का राजनैतिक गढ ध्वस्त! टेकचंद्र …

BJP लोकसभा में हुई गलती विधानसभा में नहीं दोहराएगी

BJP लोकसभा में हुई गलती विधानसभा में नहीं दोहराएगी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *