Breaking News

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी वर्गाला नियोजित वेळेत निधी उपलब्ध करून देण्याबाबत केंद्रीय शहर विकास मंत्र्यांकडे केली मागणी खासदार रामदास तडस

  • लोकसभेत नियम 377 अंतर्गत उपस्थित केला मुद्दा
  • राज्य सरकारने केंद्र सरकार सोबत समनव्यातुन कार्य करण्याची केली मागणी

वर्धाः भारताचे प्रधानमंत्री मा.श्री. नरेन्द्रजी मोदी यांची महत्वाकांक्षी योजना वर्ष 2022 पंर्यत सर्वासाठी घरे उपलब्ध करुन देण्याकरिता कार्य करीत आहे. या योजनेच्या माध्यमातून वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील नागरी क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेतून मोठया प्रमाणात घरकुले मंजूर झालेली आहेत. केन्द्रशासन घरकुल मंजूर झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान वितरण करते. परंतु केन्द्रसरकार व्दारा मंजुर असलेल्या घरकुलाचा निधी न दिल्यामुळेे घरकुलाचे कामे प्रलंबीत आहे. घराचे बांधकाम प्रारंभ झाल्यापासून ते पुर्ण होईपंर्यत एका विशिष्ट कालावधीमध्ये लाभार्थी वर्गाला निधीची आवश्यकता असते. ही प्रक्रिया सुलभ व्हावी तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रत्येक लाभाथ्र्याला कालबध्द वेळेमध्ये निधी प्राप्त व्हावी या करिता आज वर्धा लोकसभा मतदार क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत नियम 377 अंतर्गत घरकुलाच्या प्रलंबीत निधी बाबत मुद्दा उपस्थित करुन लोकसभेचे लक्ष वेधले.

       वर्धा लोकसभा क्षेत्रातील नगर परिषद, नगरपंचायत मध्ये पंतप्रधान आवास योजना अंतर्गत अनेक घरकुले मंजूर झालेली आहे, घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी लाभाथ्र्यांनी पहिला टप्पाचे अनुदान प्राप्त झाल्यामुळे आपले राहते घर पाडून बांधकाम सुरु केले परंतु उर्वरीत निधी न मिळाल्यामुळे त्यांचे घरकुलाचे काम प्रलंबीत आहे, याबाबत अनेक नागरिकांनी तसेच नगर परिषद, नगरपंचायती कडून अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या, केन्द्रसरकारने उर्वरीत निधी त्वरीत उपलब्ध करुन द्यावा यासाठी आज लोकसभेत प्रश्न उपस्थित केल्याचे खासदार रामदास तडस यावेळी म्हणाले.

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *