वर्धा प्रतिनिधी :- वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलिंग, पार्टी, ट्रीट या सर्व पाच्छात्य संस्कृतीला फाटा देत आपल्या जन्मदिवशी दि. 21/09/2020 ला समाजातील वंचितांकरिता काहीतरी मदत करून त्यांचे जगणे सुकर व्हावे या संकल्पनेतून जनक्रांती सेनेचे उपजिल्हाध्यक्ष प्रसाद कोडगीरवार यांनी अनाथालयात साजरा केला त्यांचा जन्मदिवस. आसमंत स्नेहालय या अनाथालयात पालकाविना असलेले ४० बालके व 2 म्हातारे यांचे शिक्षण व पालनपोषण संचालक श्री शिवाजी चौधरी व टीम स्वखर्चातून व लोकांनी केलेल्या मदतीतून करतात. ज्यांचे या जगात कुणीच नाही अश्या या वंचीत बालकांना योग्य संस्कार देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आसमंत स्नेहालयात हे ईश्वरीय कार्य सुरू आहे यालाच हातभार लावण्याच्या हेतूने प्रसाद कोडगीरवार यांनी तेथील बालकांना भोजन देऊन वाढदिवस साजरा केला यावेळी साहसिक जनशक्ती संघटने चे रविंद्रभाऊ कोंटबकार व जनक्रांती सेने चे जिल्हाप्रमुख सुशांतभाऊ खडसे यांच्या प्रमुख उपस्थित बालकांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व भोजन देण्यात आले
तेथील बालकांना साहसिक जनशक्ती संघटनेचे रविंद्रभाऊ कोंटबकार यांनी मार्गदर्शन केले , याप्रसंगी जनक्रांती सेना व विदर्भ युवा आघाडी टीम आवर्जून उपस्थीत होती. यासोबतच कुणाचाही आधार नसल्यामुळे आसमंत स्नेहालयात राहणारे मुले त्यांच्या सोबत सहभोजन केल्यामुळे त्यांच्या चेहरावर आनंद दिसत होता . त्यांच्या पालनपोषण करतानाचे अनुभव त्यांच्या टिम ने यांनी सांगताच सर्वांच्याच अंगावर शहारे आलेत. जनक्रांती सेनेचे उपजिल्हाध्यक्ष प्रसाद कोडगीरवार यांनी या सर्व कार्यासाठी आसमंत स्नेहालयाचे आभार मानले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी साहसिक जनशक्ती संघटनेचे रंविद्र कोंटबकार , जनक्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुशांत खडसे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करतांना रविंद्र कोंटबकार यांनी आश्रमांतील मुलांच्या व्यथा जाणुन घेत तसेच त्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्याचे यावेळी आश्र्वासन दिले .मुलांना कधीहि कोणतीहि गरज भासली तर मला सांगा असे जिल्हाध्यक्ष सुशांतभाऊ खडसे यांनी सांगितले .
या कार्यक्रमाचे आयोजन जनक्रांती सेना व विदर्भ युवा आघाडी चे तालुका अध्यक्ष मुकेश ठाकुर , माधुरी पझारे , राहुल विरुळकर , अभिषेक धुर्वे , तालुका सचिव रोशन कुसाळे, प्रकाश मसराम , अमन मसराम , विशाल नहेताम कार्तीक पाठक , यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते .