Breaking News

लग्नाच्या अवघ्या ४ महिन्यातच पूनमची गळफास घेऊन दुर्दैवी आत्महत्या,आत्महत्या नसून हत्या – वडिलांचा आरोप

Advertisements

खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मृतक पूनमच्या वडिलांची मागणी

वर्धा प्रतिनिधी : हिंगणघाट : प्राप्त माहितीनुसार
जवळच्या कुटकी येथील पूनम रामचंद्र उमाटे या (२०) वर्षीय कुमारिकेचा विवाह हिंगणघाट येथील विशाल डहाके यांच्या सोबत १६ मे रोजी लॉकडाऊनचे काळात मंदाबाई हरिदास डहाके यांच्या हिंगणघाट येथिल निवासस्थानी सर्व आप्तेष्टांच्या हजेरित संपन्न झाला होता.
दिनांक १८ सप्टेंबर रोजी अवघ्या ४ महिन्यातच पूनमने गळफास घेऊन दुर्दैवी आत्महत्या केल्याचे सासरकडील मंडळीने बातमी दिली.
परंतु सौ पुनमची आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप पुनमचे वडील रामचंद्र उमाटे तसेच आई सौ.नीता रामचंद्र उमाटे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.
पूनमच्या रहस्यमय मृत्यूमुळे विविधप्रकारचा संशय व्यक्त केला जात असून माझ्या मुलीचा खून करुन तिला फास लावल्याचा देखावा केल्याचा आरोप उमाटे दांपत्याने केला आहे. याबाबत त्यांनी संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी यांना निवेदन सादर केले. तसेच घटनेचा निष्पक्ष व सखोल तपास करुन योग्य कारवाई करीत दोषीला कठोर शिक्षा व्हावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.रामचंद्र उमाटे यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीचा विवाह १६ मे रोजी हिंदु परंपरेनुसार हिंगणघाट येथील विशाल डहाके याच्याशी कोरोनाच्या लॉकडाऊन काळात मोजक्याच आप्तेष्टांच्या उपस्थितीत झाला. लग्नानंतर काही दिवसांनी पूनमला सासरची मंडळीनी माहेरुन दागिने व रोख रक्कम आणण्याची मागणी करीत होते. सासू मंदाबाई हरिदास डहाके,पती विशाल हरिदास डहाके,देर पप्पू हरिदास डहाके हे सर्व रा.यशवंत नगर मास्टर कॉलनी हिंगणघाट व आरती विश्वास गोडे रा,रोहनखेडा ता. देवळी जी. वर्धा हि मंडळी वारंवार शिवीगाळ करून मानसिक छळ करीत होते. दागिने आण नाही तर माहेरी जा, असा दबावसुध्दा टाकत होते. अनेकवेळा त्यांनी शारीरिक छळसुध्दा केला.
याबाबत पूनमने माहेरी सांगितले होते. तेव्हा दोन्हीकडील मंडळींनी आपसात बसून एकमेकांची समजूत घालण्याचा प्रयत्नसुध्दा केला होता. परंतु पूनमला सासरच्या मंडळीने त्रास देणे बंद केले नाही. तिला मुकाट्याने त्यांचा त्रास सहन करावा लागत असे. आपला संसार उध्दवस्त होऊ नये म्हणून पूनम घर सांभाळत रहायची व अनेक बाबींकडे दुर्लक्ष करायची.शेवटी १८ सप्टेंबर रोजी घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पुनमचे वडील रामचंद्र यांना मिळाली ती घटना आत्महत्येची नसून पूनमला मारहाण करुन गळफास लावून छताला लटकविल्याचा संशय आहे. पुनमचे पती विशाल मद्यपान करुन केव्हाही आपल्या पत्नीला पैशांसाठी मारहाण करीत असायचा. त्यामुळे संशयाला आणखी बळ मिळत असल्याचे मृत पूनमच्या वडिलांचे म्हणणे आहे.
याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांना तक्रार देण्यात आली असून सासरकडील मंडळी तसेच गैरअर्जदारावर हुंड्यासाठी विवाहितेचा छळ व खुनाचा गुन्हा दाखल करून गैरअर्जदारावर कारवाई करावी अशी मागणी तक्रारीत केली आहे.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *