Breaking News

शेतकरी विधेयका विरुध्द काँग्रेसची २ ऑक्टोबरपासून स्वाक्षरी मोहीम … जिल्हाभर चार टप्पात आंदोलन – जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-  केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने विरोधी तीन विधेयक संसदेत मंजुर केले असून , या नव्या काळ्या कायाद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे . या शेतकरी विरोधी विधेयकांविरुद्ध वर्धा जिल्हाभर चार टप्पात आंदोलन केले जाणार असून २४ सप्टेंबर पासून देशव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . २ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हाभर स्वाक्षरी मोहीम राबबिली जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी दिली आहे . भाजपच्या सरकारने मंजूर करुन घेतलेल्या शेतकरी विधेयकांच्या विरोधात लाखो शेतकरी व शेतमजुर रस्त्यावर उतरुन विरोध करीत आहेत . मात्र भाजपाचे निर्दयी सरकार त्यांचा आवाज बंद करण्यासाठी लाठीहल्ला करीत आहे . या सरकारचा पूर्वानूभव पाहता संसदेत कोणतीही चर्चा व संवाद न साधता गरीब शेतकऱ्यांवर हा कायदा लादत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे . या पार्श्वभूमिवर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहूलजी गांधी यांच्या निर्देशानुसार शेतकरीविरोधी विधेयके व त्याविरोधात संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना पांठीबा देण्यासाठी २४ सष्टेबरपासून देशव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार हे आंदोलन जिल्हास्तरावर विविध स्वरुपात व राज्यस्तरावर विवीध स्वरुपात राष्ट्रीय स्तरावर किसान संमेलनाच्या माध्यमातून केले जाणार आहे . शनिवारपासून ” स्पीक अप फॉर फार्मर ” ही ऑनलाइन मोहीम सुरु करण्यात आली आहे . २ ऑक्टोंबरला किसान मजदुर बचाव दिवस १० ऑक्टोबरला राज्यस्तरीय किसान संमेलन तर २ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे . या मोहीमेत काँग्रेसचे सर्व लोकप्रतीनिधी , खासदार , आमदार , सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी केले आहे . शेतकरी , शेतमजूर , बाजार समितीतील दुकानदार , कामगार व कष्टकऱ्यांच्या स्वाक्षरीची मोहीम राबवून याबाबतचे निवेदन दिले जाणार आहे . जिल्हा व तालुकास्तरावर निदर्शने , मोर्ध्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाठींबा देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे .

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *