Breaking News

वर्धा : नियोजनबध्द कार्यशैलीमुळे गावाचा विकास करणे शक्य – खासदार रामदास तडस

Advertisements

वर्धा : देवळी:- आपल्या गावाचा कायापालट व्हावा अशी मनोमन सर्वांची इच्छा असते व प्रयत्नही करतो परंतु परिपुर्ण माहिती, अभ्यास व पाठपुरावा नसल्यामुळे आपल्या गावास न्याय देऊ शकत नाही. कुठल्याही कामाची सुरुवात करणं आणि ते काम तडीस घेऊन जाणं सोपं नसतं परंतु सरपंच गजानन हिवरकर यांनी अभ्यास व पाठपुराव्यामुळे वेगवेगळ्या योजनेतून आपल्या गावाच्या विकासासाठी निधी आणून एक आदर्श निर्माण केला आहे. कोणत्याही कामाचा पाठपुरावा केला तर अशक्य काम शक्य होते हे त्यांनी दाखवून  दिले व कमी कालावधीमध्ये अनेक काम केले हे अभिनंदनीय आहे, यामुळे गावात मोठा अपेक्षित बदल होत आहे. सक्षम सरंपचाची निवड गावक-यांनी केल्यामुळे विविध विकासकामांच्या माध्यमातून गावाचा चेहरा मोहरा बदलत गाव आदर्श होत आहे. तालुक्यात मुरदगांव (खोसे) या गावाने विकासाच्या दृष्टीने आदर्शवत व नियोजनबद्ध कार्यशैलीने वेगळा ठसा उमटविला असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी सासंद आदर्श गांव मुरदगाव (खोसे) येथील विविध कामाचे लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केले.

Advertisements

          सासंद आदर्श गांव मुरदगाव (खोसे) ता. देवळी जि. वर्धा येथे  जिल्हा वार्षिक योजना-2019-20 अंतर्गत दहन दफन विकास निधी अंतर्गत स्मशानभूमीचा शोक सभागृह लोकार्पन, जिल्हा विकास निधी 2019-20 अंतर्गत प्राथमिक शाळेचे सरक्षण भिंत व ग्रामपंचायत प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण सोहळा, खासदार स्थानिक विकास निधी 2019-20 अंतर्गत जलशुध्दीकरण व एटीम मशीनचे लोकार्पन, विशेष निधी अंतर्गत सामाजिक सभागृहाचे लोकार्पन,  जिल्हा क्रीडा विकास योजनेतून व्यायाम शाळेचा भूमीपूजन समारंभ खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते व भाजपा जिल्हाध्यक्ष डॅा शिरीष गोडे अध्यक्षतेखाली संपन्न झाला, यावेळी जि.प.उपाध्यक्षा सौ. वैशाली ज. येरावार, प.स. देवळी सभापती सौ. कुसुम प्र. चैधरी, जि.प.सदस्य व माजी सभापती मुकेश भिसे, महामंत्री मिलींद भेंडे, उपसभापती प.स. युवराज खडतकर, जि.प. सदस्य मयुरी मसराम, जयंत येरावार, देवळी विधानसभाप्रमुख दीपक फुलकरी, तालुका अध्यक्ष दशरथ भुजाडे, माजी सभापती सौ. विद्या भुजाडे, शिरपुरचे सरंपच रविन्द्र भाणारकर, आगरगावंच्या सरपंचा विभाताई राऊत, शंकरराव ठाकरे, हरिषकुमार ओझा, तानबाजी बोरेकार, अरविंद झाडे, सचिव तृप्ती गावंडे उपस्थित होते.

Advertisements

        यावेळी जिल्हाध्यक्ष डॅा शिरीष गोडे, जि.प.उपाध्यक्षा सौ. वैशाली ज. येरावार, महामंत्री मिलींद भेंडे यांनी समयोचीत मार्गदर्शन केले.

         आदरणीय खासदार श्री. रामदासजी तडस यांच्या आशिवार्दाने मी आपल्या गावाचा विकास करु शकलो, त्यांनी मला प्रत्येक अडचणी सोडविण्याकरिता मला वेळोवळी सहकार्य केल्यामुळे मुरदगांव गावाचा विकास करणे शक्य झाले आहे, त्यांचे गावाच्या वतीने मी आभार मानतो असे मत आपल्या प्रास्ताविक मध्ये सरपंच गजानन हिवरकर यांनी व्यक्त केले.

         कार्यक्रमाचे संचालन वैभव श्यामकुंवर यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपसरपंच गजानन कु-हडकर यांनी मानले, कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य संदीप हिवरकर, रुपाली निरगुडे, प्रतिभा चतुर, आशाताई ठाकरे, कल्पनाताई क्षीरसागर, वसंतराव मोडक, माजी सरपंच कोमलताई राहाटे सुभाषराव बानकर, शिक्षक अतुल ठाकरे, खोडेसर, नामदेवराव ठाकरे, धनराजजी चणेकार, आरोग्यसेविका बोबडे व गावातील नागरिक उपस्थित होते.  

Advertisements

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *