वर्धा जिल्हा प्रतिनिधी : हिंगणघाट :- आमदार समीरभाऊ कुणावार यांनी ०४-११-२०२० ला हिंगणघाट विधानसभा क्षेत्रांमध्ये बोंड सड व बोंड अळी चा सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे करिता *जिल्हाधिकारी विवेक भिमनवार* यांना तात्काळ निवेदन दिले.
या निवेदनाचा सतत पाठपुरावा घेऊन आज जिल्हाधिकारी यांनी वर्धा जिल्हा कृषी अधीक्षक यांना तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
मा. आ. समीरभाऊ कुणावार यांनी हिंगणघाट समुद्रपुर शिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन सोयाबीन, बोंड सड व बोंडअळीचे झालेले नुकसान यांची स्वतः पाहणी करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आंदोलन केले. त्याचाच परिणाम म्हणून जिल्हाधिकारी वर्धा यांनी कृषी अधीक्षक यांना सदर प्रकरणात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने प्रकरण निकाली काढावे असा आदेश दिलेला आहे यामुळे आता शेतकऱ्यांना पुढील काळात मदत मिळण्याची आशा निर्माण झालेले आहे.

आ.कुणावार यांच्या सतत पाठपुराव्या आले यश; अखेर जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने प्रकरण निकाली काढावे अशे आदेश कृषी अधीक्षक यांना दिले : यामुळे आता शेतकऱ्यांना पुढील काळात मदत मिळण्याच शक्यता
Advertisements
Advertisements
Advertisements