Breaking News

Vishwbharat

गर्दी टाळण्यासठी ऑनलाईन नोंदणी करूनच लसीकरणासाठी यावे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे नागरिकांना आवाहन

गर्दी टाळण्यासठी ऑनलाईन नोंदणी करूनच लसीकरणासाठी यावे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे नागरिकांना आवाहन  पहिल्या दिवशी 18 ते 44 वयोगटातील 1193 नागरिकांना दिली लस  कुंभमेळाव्यातून येणाऱ्या भाविकांना विलगीकरणात ठेवावे चंद्रपूर दि.3, लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून त्यातून कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांनी तसेच 45 वर्षावरील जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करून दिलेल्या वेळेतच …

Read More »

गत 24 तासात 993 कोरोनामुक्त, 973 पॉझिटिव्ह तर 22 मृत्यू

गत 24 तासात 993 कोरोनामुक्त, 973 पॉझिटिव्ह तर 22 मृत्यू आतापर्यंत 46,125 जणांची कोरोनावर मात ॲक्टीव पॉझिटिव्ह 16,767 चंद्रपूर, दि. 3 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 993 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 973 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 22 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 63 हजार 868 …

Read More »

रेमडेसिवीर इंजेक्शन डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसारच  – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

रेमडेसिवीर इंजेक्शन डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसारच  – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने • नातेवाईक अथवा लोकप्रतिनिधी यांची शिफारस ग्राह्य नाही चंद्रपूर दि.3, जिल्हा प्रशासनाकडून रेमडेसिवीर इंजेक्शन मिळण्याची प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून रुग्णांचे नातेवाईक अथवा लोकप्रतिनिधी यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या शिफारशीने वाटप न होता सदर रुग्णालयात प्राप्त होणाऱ्या साठ्यातून त्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनच्या आधारे व गरजेनुसारच रेमडेसिवीर इंन्जेक्शनचे वाटप  करण्यात येते अशी माहिती जिल्हाधिकारी …

Read More »

जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन राऊत सेवानिवृत्त.

जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन राऊत सेवानिवृत्त. संपूर्ण महाराष्ट्रात कोविड नियंत्रणाकरिता आयुष काढाचे महत्व पोहोचविण्याचे उत्कृष्ट कार्य. चंद्रपूर दि. 1 मे : आरोग्य विभागातील जिल्हा आयुष अधिकारी तथा आयुर्वेद विस्तार अधिकारी डाॅ.गजानन रामचंद्र राऊत हे दि.३० एप्रिल २०२१ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.संपूर्ण महाराष्ट्रात सर्व प्रथम कोविड नियंत्रणाकरिता आयुषकाढा,आयुष औषधांचे वाटप,प्रत्येक गावात घरा-घरापर्यंत आयुर्वेद पोहोचविण्याकरिता मोठ्या प्रमाणात आयुषची प्रसिध्दी इत्यादी …

Read More »

नियोजनबद्ध पद्धतीने कोरोनावर मात करणे शक्य. – पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार

*नियोजनबद्ध पद्धतीने कोरोनावर मात करणे शक्य. – पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार *चंद्रपूर बेड मॅनेजमेंट पोर्टलचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. * पालकमंत्र्यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस. *महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा चंद्रपूर दि.1मे : कोरोनाचे हे संकट अधिक तीव्र आहे. त्यामुळे पुढचे नियोजन करताना ऑक्सिजन व मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.तसेच या संकटावर …

Read More »

रास्त अन्नधान्यात वाढ करुन मोफत अन्नधान्य उपलब्ध करा BRSP चंद्रपूर जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पाईकराव यांची मागणी

रास्त अन्नधान्यात वाढ करुन मोफत अन्नधान्य उपलब्ध करा BRSP चंद्रपूर जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पाईकराव यांची मागणी घुग्घुस प्रभाकर कुम्मरी-  बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा घुग्घुस च्या माध्यमातून प्रशासक तहसीलदार नगर परिषद घुग्घुस यांच्या मार्फत जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले की संपुर्ण महाराष्ट्रात वाढत्या कोरोना प्रादुर्भावा मुळे लॉकडाऊन करण्यात आले या लॉकडाऊन मुळे गोरगरिब जनतेला घराबाहेर जाऊन काम करणे …

Read More »

वैक्सीन केंद्र लगने की मांग

प्रभाकर कुम्मरी घुग्घुस- दिनांक २७/४/२१ मंगलवार को कैलाश नगर, माथोली और जुगाद ग्राम पंचायत के सदस्य ॲड. प्रतीक्षा अरुण देऊळकर की ओर से तीन गाव कैलाश नगर, माथोली, जुगाद मे से कोई भी एक गाव मे ( कोविड वैक्सीन केंद्र ) लगाने के लिये सरपंच को निवेदन दिया , इन गाव की लोक संख्या 2000 से 3000 तक है , …

Read More »

पुढचे पाच दिवस पावसाचे    – विदर्भातही बरसणार  – हवामान खात्याचा अंदाज  

पुढचे पाच दिवस पावसाचे – विदर्भातही बरसणार – हवामान खात्याचा अंदाज मुंबई, राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट दूर झाले नाही. सध्या पश्चिम विदर्भ ते दक्षिण तामिळनाडू आणि कर्नाटक या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. शिवाय दक्षिण महाराष्ट्रात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी राज्यात अनेक ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस पडत आहे. पुढील आणखी पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचे …

Read More »

आर्वीची वैशाली हिवसे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या पहिली महिला सिईओ

आर्वीची वैशाली हिवसे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या पहिली महिला सिईओ वर्धा- आर्वीतील वैशाली सुरेशचंद्र हिवसे यांची बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या कंपनीने कमांडिंग ऑफिसरपदी नियुक्ती केली आहे. पहिल्या महिला अधिकारी म्हणून वर्धा जिल्ह्याचेच नव्हे तर विदर्भाचे नाव मोठं केले आहे. रोड कंट्रक्शन कंपनीने (आरसीसी) इंडिया चीन बॉर्डर कनेक्टिव्हिटीची जबाबदारी महिला सशक्तीकरण म्हणून आर्वीच्या वैशाली हिवसे यांना दिली. वैशालीचे दहावीपर्यंतचे शिक्षण येथील मॉडेल …

Read More »

ग्रामीण भागात कोविड दक्षता केंद्र उभारा- खा. बाळू धानोरकर यांचे निर्देश

ग्रामीण भागात कोविड दक्षता केंद्र उभारा- खा. बाळू धानोरकर यांचे निर्देश वरोडा- वरोडा शहरात व ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढत आहे. शहरात उभारण्यात आलेले कोरोना दक्षता केंद्र अपुरे पाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ज्या व्यक्तींंचा अहवाल सकारात्मक आला असेल, त्यांच्यावर त्याच परिसरात उपचार व्हावे यासाठी ग्रामीण कोरोना दक्षता केंद्राची तातडीने उभारणी करावी, असे निर्देश खा. बाळू धानोरकर यांनी दिली. …

Read More »