Breaking News

नागपूर

रामभक्त हनुमंताच्या सर्वात उंच मूर्ती : बुलढाण्यातील नांदूऱ्याचाही समावेश

बुद्धी, शक्ती आणि भक्ती यांचा सुंदर समन्वय पाहायचा असेल तर ‘श्रीरामभक्त हनुमंता’कडे लक्ष वेधण्यात येते. विद्वत्ता, बलोपासना, शौर्य आणि भक्तीसारख्या असंख्य गुण असलेल्या मारुतीरायाच्या जन्माचा महन्मंगल उत्सव आज देश-विदेशात भक्तिभावाने साजरा होत आहे. देशात आणि परदेशातही मारुतीच्या अनेक उंच मूर्ती आहेत. त्यापैकी भारतातील काही उंच मूर्तींची ही माहिती… मंडपम हनुमान देशातील सर्वात उंच हनुमानाची मूर्ती आंध— प्रदेशातील नरसन्नपेटामधील मंडपमजवळ आहे. …

Read More »

विभागीय आयुक्त केंद्रेकर अचानक पोहचले सिल्लोड तहसील कार्यालयात : अनेक अधिकारी, कर्मचारी गैरहजर

औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अचानक सिल्लोड तहसील कार्यालयात भेट दिली. त्यात अनेक नायब तहसीलदार आणि कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे केंद्रेकर कुणावर कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अलीकडे सिल्लोड तहसील कार्यालयात सावळागोंधळ सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे आता कामचुकार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Read More »

नागपूरजवळ बसने घेतला पेट : प्रवाशांमध्ये भीती

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कोंढाळी येथे आज मंगळवारला सकाळी शॉट सर्किटमुळे शिवशाही बसने पेट घेतला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. ही बस नागपूर येथून अमरावती कडे जात होती, तेव्हा अचानक पेट घेतला. ‘विश्व भारत’चे प्रेक्षक तौसिफ़ पठाण यांनी उपरोक्त माहिती दिली.

Read More »

नागपूरकरांना मोठा दणका! वीजेनंतर आता पाण्यासाठी द्यावे लागणार जास्त पैसे

राज्यात 1 एप्रिलपासून वीजदरवाढ लागू केली.त्यामुळे आधीच महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचा खिसा रिकामा होत आहे. RBI EMI, कर्जावरील व्याजदर वाढवत आहे. त्यामुळे खिशाला कात्री लागली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. अशातच आता नागपूरकरांना पाण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. नागपूरमध्ये वीज दरवाढीनंतर आता पाणीपट्टीही वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागपूरकरांना पाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. या महिन्यापासूनच हा नियम …

Read More »

‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी देवनाथ गंडाटे यांची नियुक्ती

राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडियाची ओळख आहे. या संघटनेच्या डिजिटल विभागाच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी देवनाथ गंडाटे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि डिजिटल मीडिया विभाग प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड तसेच नागपूर जिल्हाध्यक्ष आनंद आंबेकर यांनी ही नियुक्ती केली आहे. त्यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच देण्यात आले. देवनाथ गंडाटे २००२ पासून पत्रकारितेत कार्यरत …

Read More »

नागपूरजवळील घटना : चंदनाच्या हजारो झाडांना लागली आग

चंद्रपूर जिल्ह्यातील मांगली देवतळे येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील तब्बल एक हजार चंदनाची झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. ही आग नैसर्गिक की मानवनिर्मित याचा उलगडा अद्याप होऊ शकला नाही. मात्र, या आगीमुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. मांगली देवतळे येथे जयंत नौकरकार यांनी दोन वर्षांपूर्वी शेतात चंदनाची सुमारे एक हजार तर इतर फळांची सुमारे ६०० झाडे लावली होती. दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या …

Read More »

महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नावे फसवणूक : पैसेही उकळले

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या पत्नी आणि लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांचं फेक ट्वीटर अकाऊंट तयार करण्यात आले.त्यानंतर या ट्वीटरच्या माध्यमातून पैसे उकळण्यात आले. हा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) या ठिकाणी उघडकीस आला आहे. मागच्या काही वर्षांपासून ऑनलाईन फसवणूकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आपला ओटीपी, बँक अकाऊंट नंबर, क्रेडिट किंवा डेबिट …

Read More »

कृषीमंत्र्याच्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात भ्रष्टाचाराचं पीक : महसूल, कृषी विभागाकडून सामान्यांची गळचेपी

✍️मोहन कारेमोरे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघामध्येच कृषी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने याप्रकरणी तीन जणांना रंगेहात पकडले आहे. यात तालुका कृषी अधिकारी शिरीष घनबहादुर, मंडळ कृषी अधिकारी विजयकुमार नरवडे, कंत्राटी ऑपरेटर सागर नलावडे आणि कृषी अधिकारी बाळासाहेब संपतराव निकम यांना 24 हजार 500 रुपये घेताना रंगेहात अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंध …

Read More »

नागपूरमध्ये अत्याचार : प्रियकराने केली प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या

नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रियकराने प्रेयसीवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे. दीपक इंगळे असं या प्रियकराचं नाव आहे. वाठोडा पोलीस ठाण्यात महिलेची मिसिंगची तक्रार समोर आली होती. त्याचा तपास करताना ही माहिती समोर आली. दीपक इंगळेची कसून चौकशी केली असताना त्याने हत्येची कबुली दिली. सुषमा काळवंडे असं मृत महिलेचं नाव आहे. काय आहे प्रकरण? दीपक …

Read More »