Breaking News

नागपूर

पावसामुळे नागपुरातील वकिलांनी न्यायालयाला काय केली विनंती?

नागपूर शहरात शनिवार सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीत नागपूरच्या जिल्हा वकील संघटनेच्यावतीने नागपूर जिल्हा व सत्र न्यायाधीश यांना पत्राद्वारे विशेष विनंती करण्यात आली. नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या कोणत्याही न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये पुढील दोन दिवस कुठलेही विपरित आदेश न देण्याची विनंती करण्यात आली. जिल्हा न्यायाधीशांनी सर्व न्यायालयांना …

Read More »

नागपुरातील पारडीत पावसामुळे घरात निघाले साप

नागपुरातील पारडी परिसरात पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सर्वत्र पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पारडीतील महेश चांभारे आणि अन्य नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने भीतीचे वातावरण आहे. नागपूर महापालिका गाढ झोपेत आहे. काही घरात साप शिरल्याचे समजते. रोगराईचा धोका वाढेल.तरीही महापालिका कुठे गायब आहे, असा प्रश्न आहे.

Read More »

सिमेंट रस्त्यामुळे नागपुरात शिरले घरात पाणी : महापालिका झोपेत

विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा “रेड अलर्ट” दिला आहे . विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात पहाटेपासून मुसळधार पाऊस दाखल झाला असून अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने ठाण मांडले असून नागपूर वर्धेसह अनेक जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.   ग्रामीण भागात नदीनाले भरण्याच्या मार्गावर आहेत. लाखांदूर …

Read More »

पावसाचे थैमान : नागपूरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर

विदर्भात (Vidarbha) आज सकाळपासून मुसळधार पाऊस (Rain) सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूरला (Chandrapur) आज रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आलेला आहे. तर नागपूर (Nagpur), गडचिरोली (Gadchiroli), वर्धा (Wardha), अमरावती (Amaravati) या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे.   नागपूरमधील शाळा-कॉलेजला …

Read More »

गोसीखुर्द धरणाचे १९ दरवाजे उघडले : नागपूर, भंडाऱ्यातील नागरिकांना धोका

विदर्भातील सर्वात मोठ्या इंदिरासागर गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी झालेल्या पावसामुळे धरण पातळीत वाढ झाली असून आज धरणाची १९ वक्रदारे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत.   या १९ वक्रदारातून २२१४.१२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून धरणाच्या खालून वाहणाऱ्या वैनगंगा नदीमध्ये होत आहे. त्यामुळे पूर्णपणे सुकून गेलेली वैनगंगा नदी भरून वाहत आहे. काल सायंकाळपासून गोसीखुर्द धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात व नागपूर …

Read More »

महादूला येथे आखाडी पुजेचा समारोप

आज दि.16/07/24 मंगळवार ला महादुला येथे आखाडी पुजा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने व आनंदात पार पडला. या प्रसंगी आयोजक कामठी तालुका सेवाधीकारी व प्रकाशराव भालेराव. ह.भ.प.रामंभाऊजी ढोक महाराज, कोराडी सेवा सहकारी सोसायटी संचालक. रामाजी ढेंगरे,गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव. बबनराव ढेंगरे, धनगौरी जेष्ट नागरीक मंडळाचे अध्यक्ष. सुर्यभानजी हींगनेकर, उपाध्यक्ष बाजीराव ढेंगरे, विनायक राव भालेराव, बाबाराव भालेराव, सामाजीक कार्यकर्ते राजुभाऊ सेवतकर, ग्गाधरजी ढेंगरे,महादेव …

Read More »

नागपुरात एकाच भूखंडाची दोघांना विक्री : आमदार म्हणतात, नागपुरात भूखंड माफियाचे ‘हौसले बुलंद’

नागपुरात एकाच भूखंडाची दोघांना विक्री करून भूविकासकाने एका महिलेची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी निर्मला श्रीकृष्ण मातीखाये (५९) रा. गणेशपूर, भंडारा यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. प्रकाश संतोष मोहोड (४४) रा. झिंगाबाई टाकळी असे आरोपीचे नाव आहे. आरोपी प्रकाश मोहोड याने गोधनी रोडवर सफल लॅन्ड डेव्हलपर्स नावाने कार्यालय उघडले होते. निर्मलाचे पती श्रीकृष्ण हे महावितरण कंपनीत …

Read More »

पालकमंत्री बेपत्ता असल्याची पोलीस ठाण्यात तक्रार

विकासाचा प्रश्न, रस्ते, पाणी आणि आरोग्यविषयक प्रश्न कायम असताना जिल्ह्याचे भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्ह्याकडे फिरकुनही पाहिले नाही. त्यामुळे जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून थाऱ्यावर नसलेले पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित बेपत्ता झाल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अजय मेश्राम यांनी थेट पोलीस ठाण्यात केली. सध्या जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरत आहे.   नऊ महिन्यांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री …

Read More »

शाहिर कलाकारांच्या पाठीशी नेहमी राहणार- आमदार पंकज भोयर

शाहिर कलाकारांच्या पाठीशी नेहमी राहणार- आमदार पंकज भोयर शाहीर कलाकार यांच्या न्याय हक्कासाठी मी सदैव तत्पर – शाहीर बावनकुळे वर्धा :-भारतीय कलाकार शाहीर मंडळ आणि राष्ट्रीय बजरंगी दुत संघ महाराष्ट्र व सर्वधर्म समभाव भजनी मंडळ तर्फे भव्य लोक कलावंत मेळावा दिनांक ७ जुलाई २०२४ रविवार रोजी राम मंदिर गांधी नगर वर्धा मधे भव्य लोक कलावंत मेळावाच्या आयोजन करण्यात आला होता …

Read More »

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या महादुला कार्यालयावर धडक मोर्चा

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या महादुला कार्यालयावर धडक मोर्चा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   *नागपुर जिल्हाचे महादुला- कोराडी येथील माजी नगर पार्षद रत्नदिपभाऊ रंगारी* यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. महादुला भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तर्फे पाणी पुरवठा केला जातो परंतु मागील काही महिन्यांपासून महादुला येथील मागासलेल्या भागात नियमित पाणी पुरवठा होत नाही आहे त्याचप्रमाणे प्राधीकरण तर्फे दुषित पाण्याचा पुरवठा करण्यात …

Read More »