महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील पवनी बफर वन क्षेत्रात 12 जानेवारीला वाघाची शिकार झाली.या प्रकरणात 7 आरोपींना अटक करण्यात आली. सध्या सर्व आरोपी नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात आहे. आरोपींकडून मिळालेली माहिती पडताळण्याचे काम सुरू आहे. त्यावरून वाघाची शिकार अंधश्रद्धेतून झाल्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. यातील अटक केलेल्या जितेंद्र वरखडे या आरोपीने गुन्ह्यात वापरलेले एक हत्यार दाखवले. त्याला वन विभागाने जप्त केले. ताब्यात …
Read More »नागपुरात केंद्रीय मंत्र्याच्या नावे कोटींची मागितली खंडणी : चौघांना अटक
नागपुरातील एका मोठ्या कोळसा व्यापाऱ्याला चौघांनी थेट केंद्रीय कोळसा मंत्र्यांच्या नावावर तब्बल १ कोटी खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास बदनाम करण्याची धमकी दिली. प्रकरणी पोलिसांनी नागपुरातील तीन तोतया पत्रकारांसह चौघांना अटक केली आहे. पीयूष पुरोहित, राष्ट्रभान पोर्टलचा पत्रकार संजय बघेल, संजीत बघेल आणि वंश अग्रवाल ऊर्फ मयंक कुमार अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलिस कोठडीचे आदेश …
Read More »नागपुरातील भूमी अभिलेख विभाग भ्रष्टाचाराचा अड्डा : शेतकऱ्यांना अधिकारी देतात त्रास
नागपुरातील भूमी अभिलेख विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. या कार्यालयाने एका सत्तर वर्षीय वृद्धाला जिवंत असताना मृत्यू दाखल्याची मागणी केल्याचे प्रकरण ‘विश्व भारत’ने लावून धरले होते. या विभागाकडे शेतकरी मोठ्या आशेने बघतोय. शेत मोजणी करण्यासाठी अनेक अर्ज कार्यालयात येतात. पण, नागरिकांना नाहक त्रास देऊन प्राप्त अर्ज निकाली न काढण्याची किमया या विभागातील अधिकारी-कर्मचारी करतात. अशा भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर …
Read More »नागपुरच्या भूमी अभिलेख कार्यालयाचा पैशासाठी सामान्यांना त्रास : पवार, प्रयागीला निलंबित करा
नागपुरच्या भूमी अभिलेख कार्यालयाने एका सत्तर वर्षीय वृद्धाला जिवंत असताना मृत्यू दाखल्याची मागणी केलीय. प्रकरण असे की, उत्तमराव खराबे नागपुरातील ऑर्डनन्स फॅक्टरीत कार्यरत होते. त्यांना त्यांच्या जमिनीविषयी मोजमाप करून घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी नागपूर तहसील कार्यालय आणि भूमी अभिलेख कार्यालय गाठले. यासाठी भूमी अभिलेख अधिकारी पवार व प्रयागी यांनी त्यांना मृत्यू दाखला घेऊन येण्याचे सांगितले. काही काळ आपल्यासोबत काय होत …
Read More »सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट! अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका
औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील अजिठा, अनाड गावासह परिसरात बुधवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाचा फटका गहू, हरभरा, पिकाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. काढणीला आलेला गहू अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे पूर्णतः जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून …
Read More »नागपूर आरटीओ रवींद्र भूयारांनी महिला अधिकाऱ्याचा केला लैंगिक छळ : चौकशी सुरु
नागपूर शहर प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्यावर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याने गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी परिवहन आयुक्तांनी महिला तक्रार निवारण समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. रवींद्र भुयारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. तक्रारदार महिलेचे आरोप बिनबुडाचे आहेत. चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीला सामोरे जाणार असून, तिथे बाजू मांडणार …
Read More »अंधश्रद्धा समितीचे श्याम मानव यांचा हिंदू महासभेतर्फे निषेध
मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या समर्थनार्थ अखिल भारत हिंदू महासभेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांचा तीव्र निषेध केला आहे. हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी पत्रकाद्वारे कळविले की, श्याम मानव हे हिंदू धर्मियांना बदनाम करण्याचे कारस्थान करीत आहेत. हिंदूधर्मी हे कधीही सहन करणार नाही. हिंदू धर्मविरोधी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हिंदूधर्मा व्यतिरिक्त इतर धर्माबाबत काही …
Read More »सुनील केदारांची भाजपवर जुन्या पेन्शनवरून जोरदार टीका
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये जोरदार प्रचार सुरु आहे. या निवडणुकीच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा जुनी पेन्शन योजना आहे. प्रत्येक उमेदवार हाच मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करीत आहे. हाच धागा पकडून माजी क्रीडा मंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार यांनी पेन्शन योजनेबाबत भाजप दुटप्पी धोरणावर टीका केली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार सुधाकर अडबाले यांची प्रचारसभा …
Read More »हनुमानाच्या आदेशाने करतोय समस्या निराकरण : बागेश्वर सरकार
एका वृत्त वाहिनीला माहिती देताना बागेश्वर महाराजांनी म्हटलं आहे की, “मी कोणी तपस्वी किंवा माइंड रिडर नाही. मात्र, मी ज्यावेळी गादीवर बसलेला नसतो, त्यावेळी मी एक साधारण मनुष्य असतो. तर गादीवर बसताच हनुमान यांचे ध्यान केल्यावर जो आदेश मिळतो, तो मी कागदावर लिहितो. जेंव्हा लोक माझ्याकडे एखादी समस्या घेवून येतात तेव्हा मी आमच्या गुरूंकडून प्रेरणा घेतो आणि त्या समस्येविषयी कागदावर …
Read More »तस्कर दहशतीत : रेती चौकीची जिल्हाधिकाऱ्यांकडून अचानक पाहणी
✍️मोहन कारेमोरे नागपूर जिल्ह्यात अवैध रेती उत्खननाला सध्यातरी बऱ्यापैकी ब्रेक लागला आहे. याचे कारण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विविध भागात सीसीटीव्हीयुक्त 42 रेती तपासणी चौक्या उभारण्यात आल्या आहेत. यामुळे रेती तस्करी करणाऱ्यावर काही प्रमाणात अंकुश लागला आहे. नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अचानक काही रेती तपासणी चौकीला पहाटे-पहाटे भेटी दिल्याची माहिती आहे. यात मुख्यत्वे नागपूरच्या आसपासचा परिसर आहे. कामठी, मौदा …
Read More »